भारतात अवैधपणे रहाण्यास हिंदु साथीदाराने केले साहाय्य

हरिद्वार (उत्तराखंड) – येथे पोलिसांनी बांग्लादेशी महिला सालेहा बेगम आणि तिचा सहकारी श्यामदास यांना अटक केली. संबंधित महिला स्वतःची खरी ओळख लपवून ‘श्रुती’ या नावाने रहात होती. सालेहा बेगमने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्रही मिळवले होते. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार सालेहा वर्ष २०२३ मध्ये बांगलादेशामधून भारतात आली होती. तिला भारतात रहाण्यासाठी श्यामदास या तिच्या प्रियकराने साहाय्य केले.
🚨 Bangladeshi infiltrator arrested in Haridwar (Uttarakhand)
▪️ Fake PAN, DL & multiple IDs created
▪️ Marriage certificate & passport obtained using forged documents
▪️ Aided by a Hindu associate to stay illegally
⚠️ Hindus who abet Bangladeshi infiltration remain unaware… pic.twitter.com/eVgWl7JRaI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2026
१. सालेहा बेगम हिची सामाजिक माध्यमांद्वारे छत्तीसगडमधील श्यामदास याच्याशी ओळख झाली. तिने पहिल्या पतीला सोडून देहलीत श्यामदाससमवेत रहाण्यास आरंभ केला. व्हिसाची (एखाद्या देशात प्रवेश करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का) समयमर्यादा संपल्यानंतरही ती देशात अवैधरित्या राहिली आणि नंतर दोघे हरिद्वार येथे स्थलांतरित झाले.
२. दोघांनी मिळून अवैध मार्गाने पॅनकार्ड, वाहनचालक परवाना आणि इतर भारतीय ओळखपत्रे बनवून घेतली. याच कागदपत्रांच्या आधारे त्यांनी विवाह प्रमाणपत्र, तसेच भारतीय पारपत्रही मिळवले. (बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्रे कशी मिळतात ? प्रशासनामधील राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
३. पोलिसांनी केलेल्या झडतीच्या वेळी महिलेचे मूळ बांगलादेशी पारपत्र आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या बनावट व्यवहारात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध चालू आहे.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण