इराणचे ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर !
पूर्ण इराण एका रात्रीत संपेल ! - ट्रम्प

नवी देहली – डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २० घंट्यांचा वेळ आहे, ही खरी परिस्थिती आहे. अन्यथा इराण अमेरिकेसह तिच्या साथीदारांना पाषण युगात पाठवेल, आम्ही माघार घेणार नाही, असे प्रत्युत्तर इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद-बाघेर गालिबाफ यांचे सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक मादी महंमदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

ट्रम्प यांनी २ दिवसांपूर्वी ‘इराणने शांती प्रस्ताव स्वीकारला नाही, तर त्याला पाषाण युगात पाठवणार’, अशी धमकी दिली होती. इराणने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला २० घंट्यांची मुदत देत ७ एप्रिलच्या रात्रीपर्यंत निर्णय घेण्यास सांगितले. त्यावर मादी यांनी प्रत्युत्तर दिले.
रात्री ८ वाजता आक्रमण होईल ! – ट्रम्प
७ मार्चच्या रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार ८ एप्रिलला पहाटे ५.३० वाजता) अमेरिकेकडून इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पूल यांवर आक्रमणे होतील. पूर्ण देश एका रात्रीत संपेल, असे ट्रम्प यांनी घोषित केले आहे. याची खिल्ली उडवतांना झिम्बाब्वेच्या इराणी दूतावासाने म्हटले, ‘रात्री ८ वाजताची वेळ इतकी चांगली नाही. तुम्ही ही वेळ पालटून दुपारी १ ते २ च्या आसपास किंवा शक्य असेल, तर रात्री १ ते २ च्या आसपास करू शकता ? या महत्त्वाच्या विषयावर लक्ष ठेवण्याबद्दल धन्यवाद !’
तरुणांना एकत्र येण्याचे इराणचे आवाहन
ट्रम्प यांची धमकी लक्षात घेता इराणने देशभरातील तरुणांना एकत्र येऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सरकारने अनेक विद्यापिठांमधील तरुण, कलाकार, खेळाडू आणि युवा संघटना यांना सांगितले की, त्यांनी ७ एप्रिल या दिवशी ऊर्जा प्रकल्पांच्या आजूबाजूला मानवी साखळी सिद्ध करून उभे रहावे. याचा उद्देश सार्वजनिक पायाभूत सुविधांवर अमेरिकेने केलेल्या आक्रमणाचा निषेध करणे, हा असल्याचे सांगितले जात आहे.
इराणी नागरिकांना रेल्वेने प्रवास न करण्याचा इस्रायलचा सल्ला
इस्रायलने इराणी नागरिकांना पुढील १२ घंटे रेल्वेने प्रवास न करण्याचा आणि रेल्वे रुळांपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वे आणि रेल्वे मार्ग यांच्याजवळ तुमची उपस्थिती तुमच्या जिवाला धोका निर्माण करू शकते, असे त्याने म्हटले आहे.
तुर्कीयेतील इस्रायली दूतावासाबाहेर गोळीबार : २ आक्रमणकर्ते ठार
तुर्कीयेमील इस्तंबूल शहरातील इस्रायली वाणिज्य दूतावासाजवळ गोळीबार झाला. काही लोक बंदुका घेऊन आले आणि त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. यात २ आक्रमणकर्ते ठार झाले, तर एकाला पोलिसांनी पकडले. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. |
इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते मोजताबा खामेनी कोमामध्ये असल्याचे वृत्त

ब्रिटीश वृत्तसंस्था ‘द टाइम्स’च्या एका वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते मोजताबा खामेनी कोमामध्ये असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ७ मार्चला झालेल्या आक्रमणात ते घायाळ झाले होते. ते सध्या राज्यकारभाराचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्न्स’ने इराणच्या सरकारवर प्रत्यक्ष नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे. मोजताबा केवळ नाममात्र प्रमुख असून खरे अधिकार सैन्याकडे गेल्याचे बोलले जात आहे.

Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !