धर्म आणि अध्यात्म क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी करण्यात आले सन्मानित !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी स्वीकारला सन्मान !

पाटलीपुत्र (बिहार), ७ एप्रिल (वार्ता.) – येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना धर्म अन् अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘धर्म अलंकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्ह, माँ पटन देवी सन्मान पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या संमेलनाचे आयोजन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’, ‘साऊथ एशियन एस्ट्रो फेडरेशन’ आणि ‘एस्ट्रो, वास्तु अँड वैदिक सायन्सेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात बिहारचे ग्रामीण कार्य विभाग मंत्री श्री. अशोक चौधरी, नेपाळचे राजगुरु श्री. माधव भट्टाराय, तसेच बंगालचे कला, संस्कृती दूत श्री. अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून संशोधन सादर !
या संमेलनामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा यांच्या वतीने विविध संशोधन सादर करण्यात आले. यांत वास्तूमध्ये नामजप केल्याने होणारे सकारात्मक परिणाम, अयोध्या येथील श्रीराममंदिर, भारतीय गोमाता, भारतीय शास्त्रीय संगीत इत्यादी विविध विषयांवर आणि ‘ऑरा’(प्रभावळ) तसेच ‘एनर्जी स्कॅनर्स’च्या माध्यमातून केलेले संशोधनकार्य सादर करण्यात आले. यामुळे सनातन धर्माची वैज्ञानिकता सिद्ध झाली, तसेच ‘त्याचे पालन केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा कशी वाढते ?’, हे सर्वांना स्पष्ट झाले.
Founder of Maharshi Adhyatma Vishwavidyalay, Sachchidananda Parabrahman (Dr) Athavale, conferred the ‘Dharma Alankar Award’ at the International Astrology, Vastu & Tantra Conference in Pataliputra (Bihar).
Honoured for unparalleled contributions to Dharma & spirituality. The… pic.twitter.com/Em5xO1ZesG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 7, 2026

बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !