सामाजिक माध्यमांवर हिंदूंचा आरोप
अनेक ठिकाणी खलिस्तान्यांच्या आंदोलनाचा फज्जा
टोरंटो (कॅनडा) – ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान्यांनी त्रिवेणी मंदिराबाहेर भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. खलिस्तानी एकत्र आल्यामुळे शहरात २ घंटे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कॅनडामधील काही शहरांमध्वे स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी जनमतसंग्रह घेण्यासाठी खलिस्तानवादी संघटना आग्रही आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशातील हिंदूंच्या मंदिरांच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न खलिस्तान्यांनी केला; मात्र बहुतांश ठिकाणी या आंदोलनांचा फज्जा उडाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक माध्यमांवर काहींनी ‘खलिस्तानी आतंकवाद्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १०० कॅनेडियन डॉलरचे आमीष दाखवले. ४० ते ५० लोकांना भारताच्या विरोधात घोषणा देण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले’, असा आरोप केला आहे.
🚨 Exposed: The 'Crowd for Hire' Tactics in Canada! 🚨
Social media is buzzing with allegations from the Hindu community that Khalistani groups are using "rented crowds" to fuel protests.
Despite the noise, reports suggest these protests are flopping across multiple locations!… https://t.co/gzr4JHxOwk pic.twitter.com/Wf6VKBx3zA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 6, 2026
१. ५ मार्चच्या दुपारी मंदिरात भाविक पूजा-अर्चा करण्यासाठी एकत्र येत होते, तेव्हा दुपारी साधारण १२ ते २ या कालावधीत मंदिरासमोरील रस्त्यावर खालिस्तानी समर्थक झाले. प्रतिबंधित संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने मंदिराबाहेर निषेध नोंदवला.
२. अशाच प्रकारचे एक आंदोलन ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराबाहेरही करण्यात येणार होते; पण तेथे खालिस्तान्यांना प्रदर्शन करू दिले नाही.
कॅनडातील प्रसारमाध्यमांचे दुर्लक्षकॅनडातील माध्यमांनी खलिस्तान्यांच्या आंदोलनाचे, तसेच हिंदूंनी केलेल्या विरोधाचे वार्तांकन केले नाही. स्थानिक हिंदु समुदायाचा आरोप आहे की, कॅनेडातील माध्यमे अनेकदा अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. |
पत्रकार दर्शन महाराजा यांचा खलिस्तान्यांवर आरोप !
विश्लेषक आणि पत्रकार दर्शन महाराजा यांनी ‘एक्स’वर म्हटले की, आदोलनांमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना माहिती दिली की, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १०० कॅनेडियन डॉलर दिले जात आहेत. त्यानंतर सामाजिक माध्यमांवर हा विषय चर्चिला गेला. अनेकांनी खलिस्तानवाद्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली. टीकाकारांचे म्हणणे आहे की, कॅनडामध्ये खलिस्तानी आंदोलन जिवंत असल्याचे दाखवण्यासाठी आता भाड्याच्या गर्दीचा आधार घेतला जात आहे.
दर्शन महाराज यांनी कॅनडातील राजकारण्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून मते आणि देणग्या यांच्या लालसेपोटी येथील नेत्यांनी अशा घटकांना संरक्षण दिले आहे. त्याचाच परिणाम आहे की, आज हे लोक उद्दाम झाले आहेत.
हिंदु समूदायाचा निषेध !
‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’ आणि त्रिवेणी मंदिर प्रशासन यांनी खलिस्तान्यांच्या आंदोलनाचा निषेध केला आहे. समुदायाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, प्रार्थनास्थळांच्या बाहेर अशा राजकीय आंदोलनांचा एकमेव उद्देश भक्तांना घाबरवणे आणि शांतता भंग करणे, हा आहे. ‘हिंदु कॅनेडियन फाऊंडेशन’ने एका निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा चिथावणीखोर कृती आम्हाला आमच्या श्रद्धेपासून दूर नेऊ शकत नाही.

Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !