Mumbai Hindus Procession Attacked : गोरेगाव (मुंबई) येथे शोभायात्रेत श्रीरामाच्या भक्तीगीतांवरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !

  • शोभायात्रेत श्रीरामाच्या भक्तीगीतांवरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण !

  • बजरंग दलाचे ३ कार्यकर्ते गंभीर घायाळ ८ जणांना अटक

  • आक्रमणकर्त्यांची अनधिकृत घरे पालिकेने पाडली !

दिंडोशी संतोषनगर येथील श्री मरियम्मादेवीच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांचे प्राणघातक आक्रमण

मुंबई – येथील गोरेगाव (पूर्व) मधील दिंडोशी भागातील संतोषनगर परिसरामध्ये दक्षिण भारतीय समाजाकडून श्री मरियम्मादेवीची शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी शोभायात्रेमध्ये श्रीरामाची भक्तीगीते लावण्यात आली होती. तेव्हा धर्मांध मुसलमानांनी तलवार आणि लोखंडी सळ्या यांच्या साहाय्याने हिंदूंवर आक्रमण केले. यात बजरंग दलाचे ३ कार्यकर्ते गंभीर घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ८ जणांना अटक केली आहे. ‘ही केवळ दिखाऊपणासाठी कारवाई केली गेली असेल, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू’, अशी चेतावणी बजरंग दलाने दिली आहे. (हिंदूंनो, वारंवार आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा ! – संपादक)

तलवारी आणि दगड असलेल्या १०० जणांच्या गटाकडून नेहमीच आक्रमणे केली जातात ! – स्थानिक महिला 

एका स्थानिक महिलेने सांगितले, ‘‘येथे नेहमीच ५० ते १०० जणांचा गट तलवारी आणि दगड घेऊन असतो. त्यांच्याकडून आक्रमणे केली जातात. कुणावर आक्रमण करायचे, याची त्यांना पर्वा नसते. अनेक वर्षांपासून येथे अमली पदार्थांचा व्यवसाय चालू आहे; पण पोलीस ठोस कारवाई करत नाहीत.’’ (हा गट म्हणजे धर्मांध मुसलमान असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे; पण पोलीस अशांवर कारवाई न करता षंढ रहातात. अशांवर बडतर्फीची कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

यानंतर महापालिकेकडून आक्रमणकर्त्यांची अनधिकृत घरे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. ही घरे अनधिकृत असल्याची तक्रार महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या वेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘हनुमानचालिसा’चे पठण करणार्‍या हिंदूंनाच पोलिसांची आडकाठी ! 

शोभायात्रेत आक्रमण झाल्याच्या ठिकाणी बजरंग दलाकडून सामूहिक हनुमानचालिसाचे पठण करण्यात येत होते. तेव्हा पोलीस कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘‘हनुमानचालिसा’चे पठण बाहेर करा. येथे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.’’ तथापि बजरंग दलाचे कार्यकर्ते निर्णयावर ठाम राहिले. (आक्रमणकर्त्या धर्मांधांना नव्हे, तर हिंदूंवरच अरेरावी करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !  – संपादक)

यानंतर आक्रमणकर्त्यांची अनधिकृत घरे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. ही घरे अनधिकृत असल्याची तक्रार महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या वेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

(या बातमीतील चित्रे एआय निर्मित आहेत)

संपादकीय भूमिका

  • श्रीरामाच्या भक्तीगीतांना विरोध करणार्‍या धर्मांधांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !
  • रामराज्य येणार असलेल्या भारतात श्रीरामाची गीते वाजणारच, हे धर्मांधांनी लक्षात ठेवावे !
  • हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांचा मार खाणार आहात ? हिंदूसंघटनाचे सामर्थ्य कधी दाखवणार ?