बंगालमध्ये हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई !

‘बंगालला अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे राज्य अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. नदीच्या माध्यमातून फार मोठा भाग बांगलादेशाशी जोडलेला आहे. त्या सीमा आजही मोकळ्या आहेत. बंगालमध्ये ३४ वर्षे साम्यवादी पक्षाचे आणि आता तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. त्यांच्या कार्यकाळात या सीमा बंद करण्यासाठी अनेक वेळा संरक्षण मंत्रालयाने भूमी मागितली; पण त्यांनी देण्याचे टाळले. या सीमा अद्यापही उघड्या असल्याने घुसखोरी थांबवणे कठीण आहे. घुसखोरांना आश्रय देण्यासाठी तृणमूल काँग्रेसची एक संपूर्ण यंत्रणा काम करते. त्यांना सर्व ओळखपत्रे बनवून दिली जातात, त्यांच्या वस्त्या वसवल्या जातात आणि त्यांच्या रहाण्याची व्यवस्था केली जाते, तसेच त्यांना स्थानिक रोजगारही उपलब्ध करून दिले जातात. हे सर्व एकगठ्ठा मतांसाठी केले जाते.

श्री. सूरज कुमार सिंह

१. बंगालचे मुसलमानधार्जिणे सरकार

जोपर्यंत बंगालमध्ये सध्याचे सरकार पालटून राष्ट्रवादी विचारांचे सरकार येणार नाही, तोपर्यंत येथे कोणतेही चांगले परिवर्तन होणार नाही. ज्या बंगाल राज्याने देशालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला दिशा दाखवली. शिकागोच्या सभेत उभे राहून स्वामी विवेकानंद यांनी ‘ते सहस्रो वर्षांपासून सनातन धर्माचे ध्वजवाहक आहेत’, असे सांगितले, ज्याप्रमाणे येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाला काश्मीर जोडून ठेवण्यासाठी तेथे बलीदान दिले, आज त्या बंगालमध्ये राजकीय परिवर्तन न झाल्याने या सर्व समस्या निर्माण होत आहेत.

बंगालमध्ये अल्पसंख्यांक मुसलमानांच्या लांगूलचालनाची परिसीमा आहे. ‘ज्याचा जन्म इस्लाममध्ये झाला नाही, तो दुर्दैवी आहे’, असे येथील एक महापौर म्हणतो. येथे हिंदी भाषिकांना बाहेरचे म्हटले जाते. त्यांना शिव्या दिल्या जातात. हावडा येथे श्रीरामनवमीचा  फलक उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये लावला होता. त्यामुळे या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली. त्यांनी काही केले नाही, तेव्हा आम्ही तो काढून दुसरा फलक लावला आणि पोलीस तक्रार केली. या राज्याच्या महिला मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) व्यासपिठावरून ईदचे नमाजपठण करतात; पण गीतापठणाच्या वेळी येत नाही. त्या म्हणतात, ‘आपल्याला काफिरांशी (हिंदूंशी) लढायचे आहे.’ त्या हिंदूंना काफीर समजतात. प्रयागराज येथे हिंदूंचा महाकुंभमेळा झाला, तेव्हा त्यांनी त्याला ‘मृत्यूकुंभ’ संबोधले. बंगालमध्ये पूर्णपणे सनातनविरोधी सरकार आहे.

२. धर्मांधांचे हिंदूंवर अत्याचार

बंगालमध्ये २ राज्यघटना कार्यरत असल्याचे म्हटले जाते. भारताची स्वतंत्र राज्यघटना असतांना तेथे ममता बॅनर्जी म्हणतील तेच होते. मुर्शिदाबाद आणि मालदा हिंदूंच्या हातातून निघून गेले आहे. मुर्शिदाबाद येथे हिंदू ३० टक्क्यांहून न्यून होत चालले आहेत. काही ठिकाणी ३ ते ९ टक्के हिंदू आहेत. जेव्हा देशात ‘बंगाल फाइल्स’ चित्रपट चालू होता, तेव्हा येथील खुलियान भागात खरोखरची दंगल चालू होती. खुलियानमध्ये वक्फ बोर्डाच्या विधेयकावर उघडपणे हिंसाचार झाला. चंदन दास याची क्रूर हत्या करण्यात आली. बेदबोना या गावात भगवान शिवाच्या मंदिरात शिवलिंग तोडून लघुशंका करण्यात आली. तेथे हिंदूंना बंदुकीच्या टोकावर बलपूर्वक नमाजपठण करायला सांगितले जाते. मंदिरे तोडली जातात आणि या सर्व घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर होतात. मालदासारख्या अनेक जिल्ह्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. प्रशासन काही करत नाही. त्यामुळे हिंदूंना पलायन करण्यास बाध्य झाले आहे.

३. हिंदूंच्या संरक्षणासाठी ‘श्रीराम स्वाभिमान परिषदे’ची लढाई

सर्मिष्ठा पनोली ही युवती बंगाल येथे रहाणारी आहे. तिला कोलकाता पोलिसांनी देहलीहून उचलून आणले. तिच्या विरोधात एकीकडे धर्मांध ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत होते. तिच्या विरोधात सर्व धर्मांधांची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) काम करत होती. तिला नुपूर शर्मा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. तिची दुसरी ‘नुपूर शर्मा’ होऊ न देण्याचा प्रण आम्ही केला आणि तिच्यासाठी आवाज उठवला. ज्या वजाहत खान याने तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता, तो हिंदुद्वेष्टा होता. त्याने मां कामाख्यादेवीच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केले आणि गुन्हा नोंदवला. त्यासाठी न्यायालयीन लढाई लढली. त्यामुळे त्याला महिनोन्महिने कारागृहात रहावे लागले. आजही त्याला आसाम पोलीस शोधत आहेत आणि तो लपून बसला आहे.

हे ही वाचा → बंगालमध्ये हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठीचा लढा !

४. बंगाली हिंदूंसाठी ‘करा किंवा मरा’ची परिस्थिती

जेव्हा युद्धात आता आपण वाचणार नाही, असे सैनिकाला वाटते, तेव्हा ‘करा किंवा मरा’, अशी स्थिती निर्माण होते. आज बंगालचा हिंदू हा ‘करा किंवा मरा’ या स्थितीत आहे. अशा स्थितीत हिंदूंनी संघटित होऊन हे सरकार हटवले नाही, तर येणार्‍या काळात बंगाल हातातून गेल्याखेरीज रहाणार नाही. अशाही स्थितीत ज्याप्रमाणे हिंदूंमध्ये संघटन भाव जागृत होत आहे, ते पहाता वर्ष २०२६ मध्ये एक राष्ट्रवादी सरकार येईल, अशी आशा आहे.

या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी विचारांचे सरकार आल्यास बंगालमध्ये परत गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करू आणि परत एकदा तो ‘सोनार बांगला’ (सोन्याचा बंगाल) बनवू. बंगालने जगाला ज्ञान दिले आहे, बंगालने ‘वन्दे मातरम्’ दिले. राममोहन रायपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेक थोर पुरुष येथे झाले. क्रांतीकारक प्रफुल्ल चाकी यांनी ते स्वतः इंग्रजांच्या हाती लागू नयेत; म्हणून त्यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. त्याच दिवशी केवळ १८ वर्षांचे खुदिराम बोस यांनाही अटक झाली होती. त्यांनी छातीला ‘भगवद्गीता’ कवटाळून आणि ‘वन्दे मातरम्’चा जयघोष करत फाशी स्वीकारली. त्यामुळे पूर्वीचा बंगाल पहाण्यासाठी राजकीय परिर्वतन अतिशय आवश्यक आहे.’

– श्री. सूरज कुमार सिंह, संस्थापक सचिव, श्रीराम स्वाभिमान परिषद, बंगाल.