
१. धर्माच्या वाटेवर मार्गक्रमण करतांना जरी अपयश आले, तरी ते फार मोठे यश ठरणे !
‘तोच जिवंत आहे, ज्याच्या जीवनात धर्म आहे. बाकीचे सगळे मृतवत् आहेत. धर्माविना सगळे निष्फळ आहे. धर्माच्या वाटेवर जरी अपयश आले, तरी ते फार मोठे यश ठरते. अधर्माच्या वाटेवर जरी मोठे यश आले, तरी ते धर्माच्या वाटेवर फार मोठे अपयश सिद्ध होते.
२. विषाचेही अमृत बनवण्याची विलक्षण शक्ती धर्मात असणे !
धर्मात विलक्षण शक्ती आहे. विषाचेही तो अमृत बनवतो. अधर्म अमृताचेही विष बनवतो. अधर्माने वागणारा राहू (राहू-केतुपैकी राहू) अमृत पिऊनही मेला !
३. विश्वकल्याणाकरता प्रखर हलाहल पिऊनही अमर होणारे शिवशंकर हे धर्म काटेकोर आचरणारे महान आदर्श ठरले !
धर्म काटेकोर आचरणारे विश्वकल्याणाकरता कणा-कणाने झिजणारे शिवशंकर प्रखर हलाहल विष पिऊनही अमर झाले. निलकंठ झाले. प्रत्येक मनुष्याने नीलकंठ महादेव बनण्याचे सामर्थ्य संपादन करावे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१४)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?