|

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २ एप्रिलला येथे कारवाई करत ४ आतंकवाद्यांना अटक केली. याचा खुलासा ३ एप्रिलला करण्यात आला. हे आतंकवादी उत्तरप्रदेशातील रहिवासी असून त्यांना पाकिस्तानमधून आतंकवादी आक्रमण करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. या आतंकवाद्यांनी भारतात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडवल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. ‘टेलिग्राम’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘सिग्नल’ यांसारख्या सुरक्षित समजल्या जाणार्या सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानातील आतंकवादी यांच्या संपर्कात होते. देशातील प्रतिष्ठित संस्था, रेल्वे स्थानके आणि गाड्या यांमध्ये स्फोट घडवण्याच्या हे चौघे सिद्धतेत होते. त्यांची ओळख साकिब उपाख्य ‘डेव्हिल’, अरबाब, विकास गहलावत उपाख्य रौनक आणि लोकेश उपाख्य बाबू उपाख्य पपला पंडित अशी झाली आहे.
🚨 4 Arrested by UP ATS
for Plotting Serial Bomb Blasts Across India!Targets included prestigious institutions, crowded areas, vehicles & railway stations. Inputs reportedly linked to Pakistan. 🇮🇳
Those dismissing films like Dhurandhar: The Revenge as “propaganda” must now… pic.twitter.com/2rKOYDfWwH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 4, 2026
चौकशीतून समोर आले महत्त्वपूर्ण खुलासे !
१. आतंकवाद्यांकडून रसायनाने भरलेला कॅन, ७ मोबाईल, २४ भित्तीपत्रके आणि आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत. २ एप्रिलला त्यांचा लक्ष्मणपुरीचे रेल्वे स्थानक उडवण्याचा कट होता. तथापि पोलिसांना त्यांची माहिती वेळीच मिळून त्यांनी कारवाई केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
२. साकिब या टोळीचा प्रमुख होता. तो मूळचा राज्यातील मेरठ जिल्ह्यात असलेल्या अगवानपूर गावाचा रहिवासी आहे. तो केस कापण्याचे काम करतो. सामाजिक माध्यमांतून तो पाकिस्तानमधील ‘हँडलर्स’च्या (आतंकवादी समन्वयकांच्या) संपर्कात आला.
३. टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि सिग्नल या माध्यमांतून तो पाकिस्तानातील जाळे, कट्टरपंथी गट आणि अफगाणिस्तानमधील काही संशयास्पद क्रमांक यांच्याशी जोडला गेला. साकिबने त्याच्याच गावातील अरबाबला या यंत्रणेत सहभागी केले. यानंतर त्याने गौतमबुद्ध नगर येथील विकास गहलावत उपाख्य रौनक आणि लोकेश यांनाही टोळीत जोडले.
४. हे सर्व आरोपी पैशांच्या लालसेपोटी आणि कट्टरपंथी प्रभावाखाली येऊन या कटाचा भाग बनले. ते वेगवेगळ्या ठिकाणी रेकी (पहाणी) आणि इतर कारवाया करत होते.
५. या टोळीचा मुख्य उद्देश भारतात भीती आणि अस्थिरता यांचे वातावरण निर्माण करणे हा होता. त्यांनी गाझियाबाद, अलीगड आणि लक्ष्मणपुरी यांसारख्या शहरांमधील अनेक ठिकाणांची रेकी केली होती.
६. टोळीचे सदस्य छोट्या-छोट्या जाळपोळीच्या घटना घडवून त्याचे व्हिडिओ बनवून पाकमधील आतंकवाद्यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन करत होते. यातून त्यांना पैसे पाठवले जात.
७. चौघांना भडकावण्यासाठी त्यांना धर्माच्या नावावर हिंसा आणि जाळपोळ करण्यासाठी प्रेरित केले जात होते.
संपादकीय भूमिका
|
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !