
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईविषयी अश्लील आणि भडकावू वक्तव्य करणार्या मौलाना अब्दुल्ला सलीम याला बिहारमधून अटक केली आहे. रमझानच्या काळात एका धार्मिक सभेत मौलानाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मौलाना अब्दुल्ला सलीम हा बिहारमधील जोकीहाट परिसरातील रहिवासी आहे. अटकेनंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कडक सुरक्षाव्यवस्थेत मौलानाला उत्तरप्रदेशात आणले आहे.(इस्लामचा अभ्यासक असलेल्या मौलानाला इतरांच्या आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे, हे कळत नाही, तर मग सामान्य धर्मांध कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)
🚨 Hate Speech Meets the Law 🚨
Maulana Abdullah Salim Chaturvedi been arrested in Bihar for making derogatory remarks against the mother of Yogi Adityanath during a Ramadan sermon
⚖️ Over 80 FIRs have been filed across multiple locations
🚔 Arrest carried out by UP STF in… pic.twitter.com/4vs4nMjCFh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 31, 2026
रमजानच्या कालावधीत मौलानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. उत्तरप्रदेशातील गोहत्या प्रतिबंधक कायद्यावर टीका करतांना त्याने मुख्यमंत्र्यांच्या आईचा उल्लेख करून वादग्रस्त विधान केले होते. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मौलानाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात मौलानाच्या विरोधात उत्तरप्रदेशात १२० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका‘मौलाना’ म्हणजे इस्लामचा अभ्यासक. असा कथित अभ्यासकच हीन भाषा वापरत असेल, तर सामान्य धर्मांध मुसलमान हिंदूंविषयी कसे विचार करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !