‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी झाला होता घायाळ !

लाहोर (पाकिस्तान) – पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ महंमद ताहिर अन्वर (वय ६२ वर्षे) याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बहावलपूर येथे त्याचा मृत्यू झाला आहे. जैश-ए-महंमदच्या अधिकृत माध्यमातून ताहिरच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे; मात्र मृत्यूचे कारण घोषित करण्यात आलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत तो गंभीर घायाळ झाला होता.
🚨 Suspicious Death Raises Questions
Brother of Masood Azhar – head of Jaish-e-Mohammad – dies under mysterious circumstances after being injured in ‘Operation Sindoor’
Those who earlier attacked Govt & film Dhurandhar may now spin wild theories again.
Such reactions only… pic.twitter.com/rNmPQ1FOg8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
ताहिर संघटनेतील सैनिकी कामकाजाचा प्रमुख होता आणि गेल्या २ दशकांहून अधिक काळ आतंकवादी कारवाया संचालित करत होता. वर्ष २००१ नंतर अनेक प्रशिक्षण शिबिरे उभारणे आणि चालवणे यांमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. शस्त्रसाठा आणि पुरवठा व्यवस्था यांचेही दायित्व त्याच्याकडे होते. त्यामुळे तो संघटनेचा कणा मानला जात होता.
संपादकीय भूमिका‘धुरंदर’ चित्रपटावरून सरकारवर, तसेच चित्रपट निर्मात्यांवर बिनडोकपणे गरळओक करणारे आता जरी या हत्येला भारताच्या गुप्तचर यंत्रणांशी जोडून त्यांना ‘अमानवीय’ म्हणू लागले, तरी त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीवर हसण्याचे कारण नाही ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan