|

दापोली – तालुक्यातील मांदिवली येथील प्रस्तावित खाण प्रकल्पावरून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्प समर्थक यांच्यातील संघर्ष आता वाढू लागला आहे. ग्रामस्थांचा होत असलेला विरोध डावलून या प्रकल्पाला संमती देण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) एका याचिकेद्वारे दाद मागितली आहे.
ग्रामस्थांनी याचिकेत उपस्थित केलेली सूत्रे
१. कोणत्याही शासकीय अनुमतीशिवाय अनुमाने ४६४ पेक्षा अधिक झाडांची ‘पोकलेन’ यंत्राच्या सहाय्याने कत्तल करण्यात आली आहे.
२. पर्यावरणीय संमती मिळण्यापूर्वीच डोंगर कापणी आणि मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू करण्यात आले आहे.
३. सर्व्हे क्रमांक ४१२ सह लगतच्या ३८४, ३८८, ४०९ आणि ३९६ या क्षेत्रांत विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहेत.
४. वन विभागाच्या पंचनाम्यानुसार अब्दुल रहिमान मुकादम, वसीम अहमद मुकादम यांच्यासह अन्य काहींनी ही झाडतोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कृत्यासाठी वन विभागाची कोणतीही वैध अनुमती घेण्यात आलेली नव्हती.
५. हरित लवादाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधितांना नोटीस बजावली आहे. दापोली तहसील कार्यालय आणि वन विभागाने वृक्षतोड आणि पर्यावरणीय उल्लंघनाची प्रत्यक्ष पहाणी करून अहवाल सादर करावा.
६. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्राथमिक पहाणीत काही त्रुटी नोंदवल्या आहेत.
ग्रामस्थांची चेतावणी !
आमच्या गावाचे पर्यावरण आणि स्थानिकांचे हित धोक्यात घालून कोणताही प्रकल्प रेटला गेल्यास त्याला आमचा तीव्र विरोध कायम राहील, अशी चेतावणी मांदिवलीवासीयांनी दिली आहे.
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक