‘२५.१.२०२६ या दिवशी रथसप्तमी होती. त्याच्या एक मास आधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सूर्यनमस्काराचे वर्ग चालू झाले. या वर्गात आम्हाला ‘रथसप्तमीपर्यंत, म्हणजे एक मासात सूर्यनमस्कारांची संख्या वाढवत नेऊन रथसप्तमीच्या दिवशी १०८ सूर्यनमस्कार घालायचे’, असे ध्येय दिले होते. वर्गात आम्हाला ‘योग्य प्रकारे सूर्यनमस्कार कसे घालायचे ? आणि आपली क्षमता कशी वाढवायची ?’, हे शिकवले गेले. वर्गाच्या पहिल्या दिवशी आम्ही साधारण १५ ते २० सूर्यनमस्कार घातले. त्यानंतर आम्ही आमच्या क्षमतेनुसार प्रतिदिन ५ किंवा १० सूर्यनमस्कार वाढवत गेलो. असे करत देवाच्या कृपेने रथसप्तमीच्या दिवशी आम्हाला १०८ सूर्यनमस्कार घालता आले. या कालावधीत सूर्यनमस्कार घालतांना मला झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. झालेले लाभ
१ अ. शारीरिक स्तरावर
१ अ १. दोन दिवस मांड्या दुखणे; पण नंतर मांड्या दुखणे थांबून शरीर हलके आणि मन ताजेतवाने झाल्याचे जाणवणे : वर्गाचे पहिले २ दिवस माझ्या मांड्या पुष्कळ दुखू लागल्या. ‘आपल्याला सूर्यनमस्कार घालणे झेपणार नाही’, असे मला वाटले; पण तिसर्या-चौथ्या दिवशी मी वर्गाला गेल्यावर माझ्या मांड्या दुखणे आपोआप थांबले, तसेच मला माझ्या पायांमधील आणि एकूणच शरिरातील जडपणा नष्ट झाल्याचे जाणवले. या हलकेपणामुळे मला माझे मनही ताजेतवाने वाटू लागले.
१ अ २. पुष्कळ अंतर चालूनही पाय न दुखणे
अ. एक आठवडा नियमित वर्गाला गेल्यानंतर मी बाहेरगावी गेले होते. तेथे मला ३ – ४ कि.मी. चालावे लागले; पण तरीही माझे पाय दुखले नाहीत. पूर्वी १ कि.मी. चालले, तरी माझे पाय पुष्कळ दुखायचे.
आ. वर्ग चालू झाल्यानंतर एक आठवड्याने मी हंपी (कर्नाटक) येथील अंजनाद्री पर्वतावर (हनुमंताच्या जन्मस्थळी) गेले होते. त्या पर्वताला ५५० पायर्या आहेत. या ५५० पायर्या चढतांना आणि उतरतांना मला दम लागत होता; परंतु माझे पाय मुळीच दुखले नाहीत.
१ अ ३. पाठदुखी न्यून होणे : कडक गादीवर आणि भूमीवर झोपल्यावर, तसेच संगणकासमोर बराच वेळ बसून राहिल्यावर काही वेळ माझी पाठ दुखायची. सूर्यनमस्कारांमुळे माझी पाठदुखी न्यून झाली आहे. त्यामुळे मी कडक गादीवर किंवा भूमीवर झोपू शकते.
आताही संगणकासमोर सलग बसल्यावर माझी पाठ दुखते; पण त्या वेळी मी सूर्यनमस्कार घातल्यावर माझी पाठदुखी बरी होते. त्यामुळे मला पुढील सेवा चांगली करता येते.

१ आ. मानसिक स्तरावर
१ आ १. आरंभी मला सूर्यनमस्कार घालायला जाण्यासाठी उत्साह जाणवत नव्हता, तरीही मी वर्गाला गेले. तेव्हा माझ्या मनाला हलके आणि प्रसन्न वाटले.
१ आ २. मन उत्साही होऊन सेवेतील ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणे : पूर्वी माझ्या मनातील ‘अधिक क्षमतेने शारीरिक / संगणकीय सेवा करता येत नाही. सेवा करतांना फार काही सुचत नाही’ इत्यादी विचारांनी मला निरुत्साह असायचा; पण देवाने माझ्याकडून १०८ सूर्यनमस्कारांचे ध्येय पूर्ण करून घेतले. तेव्हा ‘आपण हळूहळू चिकाटीने प्रयत्न वाढवत गेल्यास ध्येय गाठता येते’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझा सेवेचाही उत्साह वाढला आणि मला सेवेतील ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.
१ इ. आध्यात्मिक स्तरावर
१. सूर्यनमस्कार घालतांना ‘माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होत आहे’, असे मला नेहमी जाणवते.
२. नामजप करत आणि गुरुदेवांचे अन् सूर्याचे स्मरण करून सूर्यनमस्कार घातल्यास मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे जाणवते.
२. आलेल्या अनुभूती
अ. सूर्यनमस्कार घालतांना मला सूक्ष्मातून २ – ३ वेळा प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूर्यनारायणाच्या रूपात दिसले.
आ. बर्याचदा गुरुदेव त्यांच्याच रूपात; पण सूर्यासारखे एकदम तेजस्वी दिसायचे आणि ‘त्यांच्याकडून माझ्या दिशेने पिवळा प्रकाश येत आहे’, असे मला जाणवायचे.
इ. माझ्या पत्रिकेत सूर्य ग्रहाचे बळ अल्प आहे. त्यामुळे मला सूर्याची उपासना करण्यास सांगितली आहे. ‘रामनाथी आश्रमात आल्यापासून मी ही उपासना केली नाही’, असे मला वाटत होते; पण ‘या सूर्यनमस्कारांच्या माध्यमातून देवाने ती उपासनाही माझ्याकडून करून घेतली’, असे मला वाटले.
या सर्व अनुभूतींबद्दल मी श्री सूर्यनारायण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांच्या कृपेने आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी बळ आणि ऊर्जा मिळो’, ही प्रार्थना !
– कु. करुणा मुळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २१ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (६.३.२०२६)
|
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांनो, देवाने दिलेल्या देहरूपी देणगीचा साधनेसाठी उपयोग करून नरदेहाचे सार्थक करा !