शेकडो हिंदूंनी घेतला सहभाग

सिल्हेट (बांगलादेश) – ‘बांगलादेश अग्निवीर’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून येथील लमाबाजार तीन मंदिर परिसरात २७ मार्चला श्रीरामनवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. येथील शिवमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी या सोहळ्याची माहिती ‘सनातन प्रभात’ला दिली.
🌞 Uplifting, heartening pictures of Ramnavmi celebrations in a Shiva temple in Sylhet, Bangladesh ! Organized by Bangladesh Agniveer !
🎇 It was a day of pure joy – morning prayers, children filling the temple with colour through art, soulful music, and yagna for peace, and a… pic.twitter.com/bLL3R6KyHE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2026
असा झाला सोहळा !

कार्यक्रमाच्या प्रारंभी ईश्वरास समर्पित प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर भजनांची प्रस्तुती झाली. लहान आणि किशोरवयीन मुलांच्या तीन वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रकला स्पर्धा अन् प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजात श्रीरामजन्म साजरा करण्यात आला. दुपारी १२.३० वाजता जागतिक शांतता आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत, ‘वैदिक शांती यज्ञ’ करण्यात आला. यानंतर ‘ब्रह्म संगीत’ सादर करण्यात आले.
या सोहळ्यानंतर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वक्त्यांनी तरुण मनांच्या सुदृढ मानसिक विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे या वेळी अधोरेखित केले.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असूनही त्यांनी अशा प्रकारे संघटित होऊन उपासना आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे ! |
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif