नवी देहली – जगातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांच्या सूचीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम स्थान पटकवले आहे. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाहीवादी नेते म्हणून घोषित करण्यात आले. या सर्वेक्षणात त्यांना ६८ टक्के इतके ‘पसंती मानांकन’ मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना अवघे ३९ टक्के इतके ‘पसंती मानांकन’ मिळाले आहे.
🌍 Global No.1 Again: Modi Leads the World with 68% Approval! 🇮🇳
📊 Narendra Modi tops global popularity rankings with a massive 68% approval rating in the latest survey by Morning Consult.
🏆 Continues to dominate as the world’s most popular leader, staying ahead of global… pic.twitter.com/17LQOwgWer
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2026
या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशांतर्गत आणि देशाबाहेर वाढत चाललेल्या लोकप्रियतेमुळे ते इतर मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांमधील नेत्यांच्या तुलनेत पुष्कळ पुढे आहेत. या सूचीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग ६२ टक्के ‘पसंती मानांकना’सह संयुक्तपणे दुसर्या स्थानावर आहेत. हे मानांकन २ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे.

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !