|

नवी देहली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील आक्रमणे ६ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचे घोषित केले. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांनी केला; मात्र इराणकडून कुणी ही विनंती केली, ते त्यांनी सांगितले नाही. या वेळी ट्रम्प यांनी इराणकडून मिळालेल्या एका भेटीचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, वाटाघाटींवरील विश्वास दर्शवण्यासाठी इराणने ८ मोठ्या तेलवाहू नौकांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची अनुमती दिली. त्यानंतर इराणने एका गोष्टीबद्दल क्षमा मागितली आणि आणखी २ नौका जाऊ देण्यास अनुमती दिली. या नौकांवर पाकिस्तानी झेंडे फडकत होते. या कृतीमुळे अमेरिकेला खात्री पटली की, वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जात आहेत.
Iran signals limited de-escalation amid ongoing tensions ⚠️
🇮🇷 Allows 10 oil tankers through Strait of Hormuz as a “goodwill” move
🇺🇸 Donald Trump says talks with Iran are “on the right track”
Reports suggest some vessels carried Pakistani flags
US pauses strikes on Iran’s… pic.twitter.com/HgSBzbhL8N
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2026
इराणने अणूकार्यक्रम थांबवला नाही, तर आक्रमणे चालूच रहातील !
ट्रम्प यांनी इराणला त्याचा अणूकार्यक्रम कायमचा सोडून देण्याची चेतावणी दिली. आहे. असे न केल्यास अमेरिकेची सैनिकी कारवाई चालूच राहील. इराणकडे नवीन मार्ग निवडण्याची संधी आहे; परंतु जर त्याने तसे केले नाही, तर अमेरिका सर्वांत मोठा धोका निर्माण करेल. अमेरिका सध्या कोणत्याही अडथळ्याविना इराणविरुद्ध कारवाई करत आहे आणि आवश्यकता पडल्यास ती अधिक तीव्र करील. करार करण्यासाठी इराणकडे असलेला वेळ झपाट्याने अल्प होत आहे आणि निर्णय घेणे हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष एका दिवसात मिटला ! – ट्रम्प यांचा पुन्हा दावाअन्य देशांची युद्ध थांबवणारे ट्रम्प स्वतः चालू केलेले युद्ध स्वतःची मोठी हानी आणि जगात हसे होत असतांना थांबवू शकत नाहीत !
ट्रम्प म्हणाले, ‘‘मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष एका दिवसात मिटवला अन्यथा यात १ कोटी लोकांचा बळी गेला असता. हा संघर्ष २ अणवस्त्रधारी देशांमध्ये होणार होता आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्ता यांची हानी झाली असती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही माझ्या भूमिकेची नोंद घेतली आणि सांगितले की, माझ्यामुळे एक मोठे संकट टळले.’’ |
युद्धामुळे कोरोना महामारीच्या काळात उद्भवलेल्या परिणामांसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

आखाती प्रदेशात चालू असलेल्या युद्धाचे जगावर काय परिणाम होतील, हे कुणीही सांगू शकत नाही. जे या युद्धात स्वतः सहभागी आहेत, त्यांनाही याची कल्पना नाही. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर आक्रमण केल्यानंतर भडकलेल्या युद्धामुळे अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. या युद्धाचे आगामी काळात कोणते गंभीर परिणाम होतील, हे आताच सांगणे अवघड आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी, उत्पादन आणि आयात-िनर्यात यांवर मोठा परिणाम झाला आहे. हायड्रोकार्बन, धातू आणि खते यांच्याशी संबंधित उद्योगांना थेट फटका बसला असून त्याचे मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या काळात ज्याप्रकारे सर्व क्षेत्राची प्रगती मंदावली होती, तशी शक्यता सध्या दिसत आहे, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियातील उद्योगपतींच्या परिषदेत केले.
पंतप्रधान मोदी इराण युद्ध थांबवू शकतात ! – अमेरिकेचे निवृत्त कर्नल मॅकग्रेगर![]() इराणसमवेत चालू असलेल्या अमेरिका-इस्रायल संघर्षाचा तणाव अल्प करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णायक भूमिका बजावू शकतात, असे विधान भू-राजकीय घडामोडींचे तज्ञ आणि अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी ए.एन्.आय. (एशियन न्यूज इंटरनॅशनल) वृत्तसंस्थेशी संवाद साधतांना केले. याचबरोबर संभाव्य मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचा उल्लेख होत आहे, यावरही त्यांनी टीका केली. पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. |
ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचे ऐकू शकतात !
मॅकग्रेगर म्हणाले की, जर भारताने मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे ऐकून घेण्याची शक्यता आहे. भारताची वाढती आर्थिक आणि सैनिकी शक्ती, तसेच भारताबद्दलचा जागतिक स्तरावर असलेला विश्वास, यामुळे भारत चांगल्या स्थितीत आहे. रशिया आणि इराणपासून ते इस्रायल आणि अमेरिकेपर्यंत जगातील सर्व प्रमुख जागतिक शक्तींमध्ये भारताबद्दल एक दुर्मिळ विश्वास आहे. त्यामुळे विरोधी गटात भारत एक दुवा म्हणून काम करू शकतो.
पंतप्रधान मोदी अशी व्यक्ती आहे जी पुतिन यांच्याशी मनमोकळा संवाद साधते, ती इराणच्या नेतृत्वाशी सहज बोलू शकते. इस्रायलचे नेतृत्वही मोदी यांच्याशी आदराने संवाद साधते आणि आम्हालाही (अमेरिकेलाही) ते सोयीस्कर वाटतात, असेही मॅकग्रेगर यांनी सांगितले.
पाकिस्तानची उडवली खिल्ली
डग्लस मॅकग्रेगर यांनी पाकिस्तानच्या संभाव्य मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, पाकिस्तानने साहाय्य देऊ करणे म्हणजे जळत्या इमारतीत अडकलेल्या व्यक्तीने त्या इमारतीमधील एक रिकामी खोली देऊ करण्यासारखे आहे.
पाकिस्तान सध्या त्याच्या अंतर्गत आव्हानांनी, आर्थिक अडचणींनी घेरलेला आहे. त्यामुळे कोणतीही अर्थपूर्ण राजनैतिक भूमिका बजावण्याच्या त्याच्या क्षमतेला मर्यादा येते. तसेच इस्रायल पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारे तटस्थ म्हणून पहाणार नाही, असा दावा मॅकग्रेगर यांनी केला.


संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी