२६ मार्च या दिवशी झालेल्या ‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने…
२६ मार्चला झालेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीरामरक्षास्तोत्र (अर्थासहित) प्रसिद्ध करत आहोत. त्यातील काही श्लोकांचा अर्थ आपण २६ मार्च या दिवशी पाहिला. आज त्यापुढील श्लोकांचा अर्थ पाहूया. संस्कृत भाषेत २ शब्दांमध्ये स्वल्पविराम येत नाही; परंतु हे स्तोत्र म्हणतांना जिथे आपण किंचित् थांबतो, तिथे २ शब्दांमध्ये स्वल्पविराम दिले आहेत. मोठ्या शब्दांचा उच्चारासाठी संधीविग्रह केला आहे, तिथे स्वल्पविराम दिला आहे; पण शब्दांत अंतर ठेवलेले नाही. यामुळे श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणार्यांना उच्चार करणे सुलभ होईल.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1022408.html

आरामः कल्पवृक्षाणां, विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां, रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६ ॥
अर्थ : कल्पवृक्षांची जणू बाग असा, सर्व आपदा (संकटे) दूर करणारा आणि तिन्ही लोकांना आनंद देणारा श्रीमान् राम आमचा स्वामी आहे.
तरुणौ रूपसम्पन्नौ, सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ, चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७ ॥
अर्थ : तरुण, सुस्वरूप, सुकुमार, महासामर्थ्यवान, कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र असलेला आणि कृष्णाजिनाचे (काळ्या मृगाच्या कातड्याचे) वस्त्र नेसलेला,
फलमूलाशिनौ दान्तौ, तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ, भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥
अर्थ : कन्दमुळे आणि फळे खाणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे हे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधू राम आणि लक्ष्मण,
शरण्यौ सर्वसत्त्वानां, श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ, त्रायेतान् नो रघूत्तमौ ॥ १९ ॥
अर्थ : सर्व जिवांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि राक्षसकुलांचा नाश करणारे रघुकुलोत्तम राम आणि लक्ष्मण हे आमचे रक्षण करोत.
आत्तसज्जधनुषा,विषुस्पृशा,वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा,वग्रतः, पथि सदैव गच्छताम् ॥ २० ॥
अर्थ : सिद्ध (सज्ज) धनुष्यबाण आणि अक्षय भाता बाळगणारे राम अन् लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी मार्गामध्ये सदैव माझ्यापुढे चालोत.
सन्नद्धः कवची खड्गी, चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोऽस्माकं, रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१ ॥
अर्थ : सदैव सज्ज असलेला, कवच (चिलखत) धारण केलेला, खड्ग हातात घेतलेला, धनुष्यबाण धारण केलेला, आमचे जणूकाही मनोरथच, असा लक्ष्मणासह जाणारा तरुण राम आमचे संरक्षण करो.
रामो दाशरथिः शूरो, लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः, कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२ ॥
अर्थ : दशरथाचा शूर पुत्र, लक्ष्मण ज्याचा अनुचर (लहान भाऊ) आहे,बलवान, ककुत्स्थाच्या वंशात जन्मलेला, पूर्णब्रह्म, कौसल्येचा पुत्र, रघुकुळात श्रेष्ठ असा राम,
वेदान्तवेद्यो यज्ञेशः, पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमान्,अप्रमेयपराक्रमः ॥ २३ ॥
अर्थ : वेदान्तानेच (आत्मज्ञानाने) ज्याचे स्वरूप ज्ञात होईल असा, यज्ञाधिपती, अनादि पुरुषोत्तम, जानकीचा नाथ, वैभवसंपन्न आणि अतुल पराक्रमी
इत्येतानि जपन्नित्यम्, मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।
अश्वमेधाधिकम् पुण्यं, सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४ ॥
अर्थ : असा (अशा नावांनी) नित्य श्रद्धापूर्वक जप करणार्या माझ्या (शिवाच्या) भक्ताला निःसंशय अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्याचा लाभ होतो.
रामन् दूर्वादलश्यामम्, पद्माक्षम् पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्, न ते संसारिणो नरः ॥ २५ ॥
अर्थ : दूर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याने पीतांबर नेसला आहे, अशा रामाची जे दिव्य नावांनी स्तुती करतात, ते लोक संसारातून (जन्म-मरणाच्या चक्रातून) सुटतात.
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं, सीतापतिं सुन्दरम् ।
काकुत्स्थङ् करुणार्णवङ् गुणनिधिं, विप्रप्रियन् धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धन्, दशरथतनयं, श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं, रघुकुलतिलकं, राघवं रावणारिम् ॥ २६ ॥
अर्थ : लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघुकुलात श्रेष्ठ, सीतापती, सुंदर, ककुत्स्थाच्या कुळात जन्मलेला, करुणेचा सागर, सर्व गुणांचा ठेवा, ब्रह्मज्ञांना प्रिय असलेला, धर्माचरणी, राजश्रेष्ठ, सत्यवचनी, दशरथाचा पुत्र, श्यामवर्ण, शांतीची जणू मूर्तीच, लोकांना आनंद देणारा, रघुकुळाला तिलकाप्रमाणे शोभा देणारा आणि रावणाचा शत्रू अशा रामाला मी वंदन करतो.
रामाय रामभद्राय, रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय, सीतायाः पतये नमः ॥ २७ ॥
अर्थ : ज्याला राम, रामभद्र, रामचंद्र, वेधा (सृष्टीकर्ता), रघुनाथ, नाथ आदी नावे आहेत, अशा सीतापती रामाला नमस्कार असो.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणम् भव राम राम ॥ २८ ॥
अर्थ : हे रघुकुलाला आनंद देणार्या रामा, भरताच्या ज्येष्ठ बंधो रामा, युद्धात कठोर होणार्या रामा, तू आमचे रक्षण कर.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि । श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि । श्रीरामचन्द्रचरणौ शरणम् प्रपद्ये ॥ २९ ॥
अर्थ : मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. वाणीने श्रीरामचंद्राच्या चरणांची (रामाची) कीर्ती गातो. श्रीरामचंद्राच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करतो. श्रीरामचंद्राच्या चरणी मी शरण आलो आहे.
(क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1023115.html
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !