साधनाप्रवास
‘याआधीच्या लेखांत आपण ‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ, त्यांच्या यजमानांचा सत्संगाला जायला झालेला विरोध, साधनेला विरोध असल्याचे काही प्रसंग, त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ करणे, पू. काकूंना विरोध झाल्याच्या प्रसंगांत त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा’ यांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘यजमानांचा विरोध सहन करूनही पू. डगवारकाकूंनी निष्ठेने साधना चालू ठेवली’, याविषयीचा पुढील भाग पाहूया.
(भाग ५ )
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020604.html

७. यजमानांचा विरोध सहन करूनही निष्ठेने साधना चालू ठेवणे
७ ऊ. रुग्णाईत असतांना ‘सेवेत खंड पडू नये’, यासाठी त्याविषयी यजमानांना न सांगणे : मला लहानपणापासूनच शारीरिक त्रास होत असत. मला डोकेदुखीचा तीव्र त्रास होता. माझा उजवा हात पुष्कळ दुखत असे. मला पुष्कळ वेळा रात्री झोप येत नसे. मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर माझे डोके दुखण्याचे प्रमाण ३० टक्के इतक्या प्रमाणात उणावले. मी सेवेला जातांना रुग्णाईत झाल्यास ‘माझ्या सेवेत खंड पडेल आणि यजमान मला बाहेर जाऊ देणार नाहीत’, असे वाटून माझी प्रकृती कितीही ठीक नसली, तरीही त्याविषयी मी यजमानांना सांगत नसे. मी सेवेला गेल्यावर त्या भागातील चिकित्सालयात जाऊन तेथे उपचार घेत असे.
७ ए. नातेवाईक घराला कुलूप पाहून परत गेल्यामुळे यजमानांनी चिडून ‘घराला कुलूप लावायचे नाही’, असे सांगणे आणि यजमानांना ‘नातेवाइकांना आधी कळवून घरी यायला सांगा’, असे शांतपणे सांगणे : सेवाग्राम येथे मोठे रुग्णालय होते. तेथे आमचे अनेक नातेवाईक औषधोपचार करण्यास येत असत. मला त्यांना जेवणाचा डबा द्यावा लागत असे. काही दिवसांनी माझ्या सेवा वाढल्याने अनेक वेळा आमच्या घराला कुलूप असायचे. नातेवाइकांना घराला कुलूप दिसल्याने ते परत जायचे आणि ते यजमानांना सांगायचे, ‘‘तुमच्या घराला नेहमीच कुलूप असते.’’ त्यामुळे यजमान माझ्यावर चिडून ‘घराला कुलूप लावायचे नाही’, असे सांगत असत. तेव्हा मी त्यांना शांतपणे सांगितले, ‘‘ज्यांना घरी यायचे आहे, त्यांनी आधी कळवायला हवे. तुम्ही घरी येणार्यांना तसे सांगा.’’
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा सर्वांसमोर आदर्श ठेवणार्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

‘साधना करतांना साधिकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रसंगी घरातील व्यक्तींचा विरोधही पत्करावा लागतो. साधनेला विरोध होत असल्यास काही साधिका घरी राहून साधना करतात, तर काही साधिका साधना करण्याचे सोडून देतात; मात्र पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे उदाहरण विरळाच !
पू. (श्रीमती) डगवार यांनी त्यांच्या यजमानांचा तीव्र विरोध सहन करून तळमळीने साधना केली. प्रसंगी त्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांच्या समवेत घराबाहेर काही घंटे थांबावे लागले. त्यांना यजमानांच्या समोर त्यांच्या नातेवाइकांशी बोलायलाही अनुमती नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परिश्रम घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून व्यष्टी अन् समष्टी साधना केली आणि अल्पावधीत संतपद गाठले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साधनेमुळे त्यांचे यजमानही साधना करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा आदर्श सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१.२०२६)
७ ऐ. यजमानांनी कितीही त्रास दिला, तरीही त्यांना ‘सेवा करणे थांबवणार नाही’, असे सांगणे : काही दिवसांनंतर मी यजमानांना शांतपणे सांगितले, ‘‘मी संसारातील सर्व दायित्व पार पाडत आहे. काही झाले, तरीही मी सेवा करणे थांबवणार नाही.’’ तेव्हा ‘पत्नी सेवेविना जगू शकत नाही’, हे त्यांच्या लक्षात आले, तरीही त्यांनी मला त्रास देणे सोडले नाही आणि मीही माझे प्रयत्न सोडले नाहीत. देवानेच मला धरून ठेवले.
७ ओ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांची परम कृपा अनुभवता येणे : विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यांत मोठ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्या. तेव्हा प्रत्येक वेळी मला (ग्रंथ प्रदर्शन, व्यासपीठ व्यवस्था, स्वागतकक्ष, आयोजन, संतकक्ष सेवा) दायित्वाच्या सेवा होत्या. मला शाळेत नोकरी करून आणि घरातील सर्व कामे करून या सेवा करायच्या होत्या. मला घरातून विरोध असल्याने वैयक्तिक तयारी करण्यासाठी अल्प वेळ मिळत असे. त्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना मी एका पिशवीत केशरी रंगाची साडी आणि अन्य आवश्यक साहित्य ठेवत असे. मला प्रत्येक हिंदु राष्ट्र-जागृती सभेला जातांना यजमानांचा विरोध होत असतांनाही ‘देवच मला घेऊन जात आहे’, याची प्रचीती येत होती. मला सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांची परम कृपा अनुभवता आली.
७ औ. यजमान रागवल्यावर ‘देव देवाण-घेवाण हिशोब लवकर संपवत आहे’, असा विचार येऊन कृतज्ञता वाटणे : मी साधना करू लागल्यावर ‘आपल्याला साधना करायची असेल, तर अहं आणि भीती यांना दूर ठेवावे लागते’, हे वाक्य माझ्या अंतर्मनावर बिंबले होते. ही केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे. मी ग्रामीण भागात प्रसाराला गेल्यावर तेथे ‘ट्रॅक्स’च्या ‘बोनेट’वर उभे राहून प्रवचन घेत असे. माझ्या नातेवाइकांनी मला पाहिल्यावर ते यजमानांना सांगत असत. तेव्हा यजमान घरी आल्यावर मला पुष्कळ रागवत असत. तेव्हा मला वाटायचे, ‘देव माझा देवाण-घेवाण हिशोब लवकर संपवत आहे. मागच्या जन्मात मी यजमानांना त्रास दिला असेल; म्हणून आता असे घडत आहे.’ मी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असे, ‘गुरुदेवा, माझा देवाण-घेवाण हिशोब लवकरात लवकर संपवा.’
(क्रमशः)
– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा.(२५.१०.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना, संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1021746.html
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान