‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई आणि सौ. पूनम प्रभुदेसाई यांची त्यांच्या जावयाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. परशुराम प्रभुदेसाई (सासरे)
अ. ‘काकांची अंतर्मुखता वाढली आहे.
आ. त्यांचे नामजपादी उपाय पूर्ण करण्याकडे लक्ष असते.
इ. त्यांच्यामधील ‘राग येणे आणि स्वतःच्या मतावर ठाम असणे’, या स्वभावदोषांचे प्रमाण न्यून झाले आहे.

२. सौ. पूनम प्रभुदेसाई (सासूबाई)
२ अ. सासूबाईंमध्ये ‘प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण आहेत.
२ आ. नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधना करण्याचे गांभीर्य : त्यांना वयोमानानुसार शारीरिक त्रास होत असला, तरीही त्या पहाटे लवकर उठून नामजपादी उपाय करतात. त्यांचे नामजपादी उपाय पूर्ण करण्याचे दिवसभरातील नियोजन ठरलेले असते. त्या दुपारी जेवल्यानंतर नामजप करून विश्रांती घेतात आणि नंतर पुन्हा नामजप करतात. त्या झोपण्यापूर्वी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण करतात. त्या व्यष्टी साधनेच्या आढावा नियमितपणे देतात.
२ इ. स्वीकारण्याची वृत्ती : पूर्वी त्यांना कुणी चुका सांगितल्यास त्यांना चुका स्वीकारता येत नव्हत्या. कुटुंबीय किंवा साधक यांच्या समवेत एखादा प्रसंग घडल्यावर त्या लगेच प्रतिक्रिया व्यक्त करत असत. त्या प्रसंगात अडकून रहात असत. ‘काही दिवसांपासून त्यांचे प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे प्रमाण अल्प झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगातील ‘ऐकण्याची वृत्ती आणि विचारण्याची वृत्ती’, ही सूत्रे ऐकल्यापासून सासूबाई आता सर्व स्वीकारतात.’
– श्री. शिवदत्त नाडकर्णी (श्री. आणि सौ. प्रभुदेसाई यांचे धाकटे जावई), फोंडा, गोवा. (१४.४.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !