संभल (उत्तरप्रदेश) येथील पोलीस उपअधीक्षक कुलदीप कुमार यांची इराण समर्थक मुसलमानांना चेतावणी !

संभल (उत्तरप्रदेश) – जगातील २ देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि भारतात काहींना विनाकारण खाज सुटली आहे. जर कुणाला दुसर्या देशाविषयी इतकेच प्रेम असेल, तर त्यांनी विमानाने तेथे जावे आणि तिथे जाऊन त्याला पाठिंबा द्यावा. भारतात आंतरराष्ट्रीय सूत्रांवरून गदारोळ आणि घोषणाबाजी सहन केली जाणार नाही. मशिदींच्या बाहेर नमाजपठण करण्यास अनुमती दिली जाणार नाही. कुणी रस्त्यावर नमाजपठण करतांना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी संभलचे विभागीय पोलीस अधिकारी कुलदीप कुमार यांनी नुकतीच ईद आणि शुक्रवारचे नमाजपठण यांपूर्वी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक मुसलमानांना दिली होती.
📍 Sambhal (Uttar Pradesh): A strong and much-needed message from CO Kuldeep Kumar👮♂️🇮🇳
"If you have so much love for another country, then go there and support it, but do not disturb the law and order of our India"
It is high time that such dutiful officers take a firm stand… pic.twitter.com/DYAYA3VyXH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
(म्हणे) ‘हा देश कुणाच्या बापाचा नाही !’ – खासदार ओवैसी यांची टीका
कुलदीप कुमार यांच्या विधानावरून खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. एका सभेत ते म्हणाले की, आम्हाला कुठे जायचे हे कुणी सांगण्यासाठी हा देश कुणाच्या बापाचा नाही. देश राज्यघटनेद्वारे चालणार कि कुणाच्या बोलण्याने ? (‘देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान तत्कालीन काँग्रेस सरकारचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केल्यावर ओवैसी यांनी यावर टीका करत अशा प्रकारचे विधान का केले नव्हते ? ‘भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन हिंदूंना भारत आणि मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले होते. त्यामुळे आताही कुणी ‘मुसलमानांना पाकिस्तान दिल्याने त्यांनी तेथे जायला हवे’, असे म्हणत असेल, तर ते चुकीचे ठरत नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असले, तर देशात उद्दाम धर्मांध आणि भारतद्वेष्टे यांच्यावर नक्कीच जरब बसून देशात कायदा आणि सुव्यवस्था नांदेल, हे निश्चित ! |
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक