|
( ‘इस्लामोफोबिया’ म्हणजे इस्लामद्वेष)

नवी देहली – काश्मीरची मुसलमान महिला पत्रकार गफिरा कादिर यांना देहलीत रहाण्यासाठी भाड्याने घर मिळत नव्हते. याला कथित ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामद्वेष) म्हणत हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी ‘बीबीसी’ने त्याविषयी एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओत दाखवल्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तूस्थिती निराळी आहे, याची माहिती देणारा दुसरा व्हिडिओ ‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंस्थेने फेसबुकवर प्रसारित केला; परंतु फेसबुचे संचालन करणार्या ‘मेटा’ आस्थापनाने ‘ऑपइंडिया’चा व्हिडिओ हिंसाचाराचे समर्थन करणार आहे’, असे कारण देत तो फेसबूकवरून हटवला. ‘मेटा’ने काढून टाकलेला हा व्हिडिओ ऑपइंडिया’ने ‘एक्स’वर प्रसारित केला आहे.
🚨 Selective Outrage by BBC?
The BBC alleges “Islamophobia” in Delhi after a Kashmiri journalist, Ghafira Qadir failed to get a rental house.
Meanwhile, @Meta removed a video by @OpIndia_com presenting another side of the story; the same video has now been re-released on X.… pic.twitter.com/Z1B8bSl3ak
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2026
‘बीबीसी’च्या व्हिडिओत काय आहे ?
‘बीबीसी’च्या व्हिडिओमध्ये ‘देहलीत काम करणार्या काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना देहलीत भाड्याने घरे मिळत नाही’, असा दावा करण्यात आला आहे. यास ‘इस्लामोफोबिया’ कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
‘ऑपइंडिया’च्या व्हिडिओत काय आहे ?
‘ऑपइंडिया’च्या व्हिडिओत विचारण्यात आले होते की, कादिर किंवा ‘बीबीसी’ यांनी ‘देहलीतील लोक काही व्यक्तींना सदनिका भाड्याने देण्यास का कचरत आहेत ?’ हे शोधण्याचा प्रयत्न का केला नाही ? काही महिन्यांपूर्वी अल्-फलाह विद्यापिठातील एका डॉक्टरने राजधानी देहलीच्या मध्यभागी असलेल्या लाल किल्ल्याजवळ आत्मघातकी आक्रमण केले होते, हे ‘बीबीसी’ हे विसरली का ? यात डझनभर लोक ठार झाले होते आणि ५० हून अधिक लोक घायाळ झाले होते. अशाच प्रकारच्या आणखी आक्रमणांचीही योजना त्याने आणि त्याच्या साथिदारांनी आखली होती. बाँबस्फोट घडवणारे आणि कट रचणारे सर्व जण देहलीपासून काही अंतरावर भाड्याने रहात होते. देहलीतील घरमालकांना त्यांची मालमत्ता भाड्याने देण्याविषयी काळजी करण्यासारखी काही वैध कारणे असू शकतात.
फेसबुकने काही सेकंदांतच ‘ऑप इंडिया’चा व्हिडिओ हटवला !
१. ‘ऑप इंडिया’ने हा व्हिडिओ ९ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता ‘मेटा’च्या फेसबुकवर प्रसारित केला; परंतु काही सेकंदांतच ‘मेटा’ने ‘या व्हिडिओवर बंदी घालण्यात आली आहे’, असे सांगणारी सूचना पाठवून तो हटवला.
२. ‘आतंकवादी आक्रमणाचे उदात्तीकरण करणे, विशिष्ट लोकांच्या गटाविरुद्ध हिंसाचाराचे समर्थन करणे आणि मानवी तस्करीसारख्या हानीकारक गुन्हेगारी कृतींना समर्थन देणे किंवा प्रोत्साहन देणे’ यांना आम्ही अनुमती देत नाही’, असे ‘मेटा’ने म्हटले आहे. (‘मेटा’ला ‘ऑपइंडिया’च्या व्हिडिओत यापैकी काय दिसले ? ही हिंदूंची गळचेपी नव्हे का ? काही वर्षांपूर्वीही ‘मेटा’ने हिंदुत्वनिष्ठ प्रसारमाध्यम ‘सनातन प्रभात’चे पान काहीही कारण नसतांना हटवून अशीच गळचेपी केली होती ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी