‘तीर्थराज प्रयागराज येथे १३.१ ते २६.२.२०२५ या कालावधीत उत्तरप्रदेश शासनाच्या वतीने महाकुंभपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. मी तेथील महाकुंभपर्वाच्या पूर्वसिद्धतेसंबंधी वार्तांकन सेवा करण्यासाठी गेलो होतो. तेथे गेल्यावर मला लक्षात आलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. प्रशासनाकडून अधिकृत स्तरावर ‘कला कुंभ’ प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना सडेतोड उत्तर देणे
‘प्रयागराज येथे ‘कला कुंभ’ प्रदर्शनाचे उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. या कलादालनात कुंभमेळ्याचा इतिहास, प्राचीन साहित्यातील पुरावे, तत्कालीन प्रशासकीय पत्रव्यवहार, कुंभमेळ्यातील ब्रिटीश आणि मोगलकालीन शासकीय हस्तक्षेप अन् संघर्षाविषयीचे पुरावे सादर केले होते. त्यातून प्रशासनाकडून अधिकृत स्तरावर विरोधकांना आपोआपच सडेतोड उत्तर दिले गेले. हे सर्वच अविस्मरणीय आणि वैशिष्ट्यपूर्ण होते.
२. ‘सनातन हिंदु राष्ट्रा’ची मुहूर्तमेढ खर्या अर्थाने रोवण्याचे कार्य साकारल्याचे अनुभवता येणे

जगन्नाथपुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, काली पिठाचे कालीसेना महाराज, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि इतर अनेक व्यक्ती यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा ज्वलंत विषय महाकुंभपर्वात ऐरणीवर आणण्यात यश मिळवले. ‘सनातन हिंदु राष्ट्रा’ची मुहूर्तमेढ खर्या अर्थाने रोवण्याचे संकल्पसिद्ध कार्य या महाकुंभपर्वात साकारल्याचे मला अनुभवायला मिळाले.
३. अनुभूती
३ अ. ‘गंगेचे अवतरण’, या नृत्यनाटिकेतील संवाद ऐकून भावजागृती होणे : ‘गंगा मंडपा’त बसून मी वार्तांकन सेवा करत असतांना समोरील व्यासपिठावर ‘गंगेचे अवतरण’, ही नृत्यनाटिका चालू झाली. मला सेवेला प्राधान्य द्यायचे असल्याने मी टंकलेखन करत असतांना नाटिकेतील संवाद माझ्या कानावर पडत होता. त्यामुळे आपोआप माझी भावजागृती झाली. ‘भारतात जन्म झाल्याने माझे जीवन कृतार्थ झाले आहे’, असे मला वाटले. एकाच वेळेस ‘सेवा चालू असणे आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे’, असे मी अनुभवत होतो.
३ आ. होम-हवनाचे ध्वनीचित्रीकरण आणि वार्तांकन सेवा करतांना भावजागृती होणे : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने एका महाराजांनी तेथे रूद्राक्षाची १२ शिवलिंगे स्थापन करून नित्य होमहवन केले. याचे ध्वनीचित्रीकरण करतांना माझी भावजागृती झाली. तेव्हा मला कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीचे स्मरण झाले.
३ इ. पवित्र स्नानानंतर आपोआप हलके आणि प्रसन्न वाटू लागणे : साधारण एक ते दीड मास मी महाकुंभपर्व येथील सेवेत सहभागी झालो होतो. मी पवित्र स्नान केल्यानंतर मला हलकेपणा जाणवू लागला आणि प्रसन्न वाटू लागले. त्या वेळी ‘माझे भूक लागणे अल्प झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
४. ‘हे महाकुंभपर्व जागतिक स्तरावर सनातन हिंदु धर्माची पताका फडकवण्यात यशस्वी ठरले’, असे मला वाटले.’
– श्री. गिरीश शरद पुजारी, मिरज (८.२.२०२६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !