शाळांमध्ये दिला जाणारा ‘कम्पल्सरी फ्रूट ब्रेक’ (फळे खाण्यासाठी मधली सुट्टी) आणि ‘ब्रेकफास्ट’ (न्याहरी)ऐवजी निरनिराळ्या फळांच्या ‘स्मूदी’ (पौष्टिक फळांचे पेय) यांमुळे गरम ताज्या खाण्याची जागा बर्याचदा फळांनी घेतलेली दिसते. फळे आवश्यक आहेतच, फळांचा मारा मात्र त्रासदायक ठरू शकतो.

१. काही सोपे नियम
अ. आयुर्वेदानुसार फळे ही पचायला जड आहेत, म्हणूनच ताप आला असता फळांचा रस किंवा फळे देऊ नयेत. फळे ही पिकलेली असावीत. तंतूयुक्त असल्याने फळातील साखर हळूहळू शरिरात शोषली जाते, जेणेकरून अधिक काळ पोट भरल्याची भावना रहाते. काही विशेष आजार नसेल, तर फळांचे रस न पिता कायम अख्खी फळे खावीत.

आ. आंबट फळे जसे बेरीज, कैरी, टोमॅटो, किवी या फळांनी आंबट चवीचे दुष्परिणाम शरिरावर होतांना दिसतात. ज्यांना घशाशी येणे, घसा खवखवणे, शिंका, सर्दी हे त्रास वारंवार होतात, त्यांना विशेषकरून आंबट फळांनी त्रास होतो, त्यामुळे ती टाळावीत.
इ. सकाळची वेळ ही कफाची असल्याने, तसेच फळे ही पचायला जड आणि कफ वाढवणारी असल्याने कफाच्या आजारात आणि सकाळी उठल्या उठल्या फळे देऊ नयेत. फळे खायची झाल्यास साधारण २ जेवणांमध्ये खावीत. जेवणाला पर्याय म्हणून खाऊ नयेत.
ई. लहान मुलांना फळांमुळे कफाचा त्रास पटकन होऊ शकतो. सर्दी-खोकला संसर्ग आणि सध्याच्या साथीचा पटकन पसरण्याचा स्वभाव बघता ती रहाण्याचे हे तर कारण नाही ना ? हे पडताळून बघावे.
उ. रहातो तेथील भूमीत उगवणारी, न्यूनतम रासायनिक खते वापरलेली आणि त्या त्या ऋतूंमधील फळे खावीत.
२. दूध आणि फळे संयोग
दूध फळांसह एकत्र करून खाऊ नये. विरुद्ध संयोगामुळे त्यात आम्लीकरण होते आणि नासण्याची प्रक्रिया चालू होते. या प्रक्रियेत निर्माण होणारे रासायनिक संघटन पचनाला त्रासदायक आहे. वारंवार असे संयोग अनेक दिवस खाल्ल्याने पुढे जाऊन मुख्यतः त्वचेसंबंधी काही रोग उत्पन्न होतात. अग्नी भरपूर चांगला असेल, व्यायाम उत्तम असेल, तर एखाद्या वेळी थोड्या प्रमाणात असे खाल्ल्याने त्रास होत नाही, हेही खरेच; परंतु सध्याच्या जगात असे असणार्या व्यक्तींची संख्या तुरळकच असल्याने नियम म्हणून पाळले असता लाभाचे ठरते. शिकरण करतांना दुधाऐवजी नारळाच्या दूधाचा वापर करता येईल.
३. फळे आणि फवारण्या
अ. मुख्यतः द्राक्षे, स्ट्रॉबेरी, कलिंगड या फळांची विशिष्ट ऋतूमध्ये पुष्कळ चलती असते. द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी ही खताच्या फवारण्यांनी सर्वाधिक दूषित फळे आहेत. आंबट असल्याने ‘मिल्कशेक’ स्वरूपात किंवा दुधासह घेतली असता या लेखात सांगितल्यानुसार शरिरात जाऊन अधिकच त्रासदायक होतात. ही फळे खायची झाल्यास किमान २० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवून प्रत्येक फळ स्वच्छ हाताने धुवून मग प्रमाणात खावीत.
आ. कलिंगड, आंबा यांना पिकवण्यासाठी वा रंग चांगला येण्यासाठी वापरलेल्या विविध रासायनिक द्रव्यांमुळे पोट बिघडणे, अंगावर गांध्या येणे, शरिरात उष्णता वाढणे, पुरळ येणे असे वेगवेगळे तोटे होतात. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे विकत घेऊन खावीत.

४. फळे, फळांचा रस कि फळांचे पाणी ?
अ. वय पुष्कळ अधिक असेल, शरिराची हालचाल नसेल, तर थोडा थोडा ताज्या फळांचा रस केवळ उन्हाळ्यात आणि ऑक्टोबरमध्ये वाढत असलेल्या तापमानाच्या आसपास घ्यावा. पोटात गुबारा असेल, आतड्यांशी निगडित आजार असतील, कफाचे त्रास असतील, अग्नी मंद असेल, तर फळे कफ वाढवणारी आणि पचायला जड असल्याने न्यून खावीत. हालचाल करू न शकणार्या ज्येष्ठ रुग्णांना मात्र फळे आणि फळांचा रस देऊ नये किंवा अगदीच चवीपुरता द्यावा.
आ. ताप पूर्ण बरा झाल्यावर सर्दी-खोकला नसतांना शक्ती येण्यासाठी फळांचा रस देता येतो. जुलाब, उलटी, तोंडाला चव नसणे असे त्रास असतांना डाळिंबाच्या रसातून औषधे दिली जातात. नाकाचा घुळणा फुटणे, भरपूर उन्हाळा अन् उष्ण प्रकृती असता, उष्ण प्रदेशात रहात असता फळांच्या फोडी घातलेले पाणी उपयोगी आहे. उन्हाळ्यात विविध आंबटगोड फळांची सरबते आणि त्यापासून केलेले पदार्थ शरिराचा कोरडेपणा आटोक्यात ठेवण्यास साहाय्य करतात.
इ. फळांच्या संशोधनातील प्रगतीमुळे वर्षभर मिळत असली, तरी त्याचे उत्पादन वाढवण्यासाठीचे जनुकीय पालट अन् सध्याच्या काळात त्याचे गुण हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. याचे चांगले लाभ मिळावेत आणि दूरगामी दुष्परिणाम टळावेत म्हणून वरील काही सोपे नियम !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’, २१.२.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?