|
हरियाणा – सोनीपत येथील ‘ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी’मधील प्राध्यापिका सरोवर झैदी यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’चे कौतुक केल्यावरून विद्यापिठातील एका विद्यार्थ्याला त्रास दिला, तसेच झैदी यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना हिटलरशी केली होती. ‘प्राध्यापिकेने मुलाचा छळ केला, त्याला अपमानित केले आणि त्याच्यासमवेत भेदभाव केला’, असा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने झैदी यांना १ फेब्रुवारी ते ३१ जुलै २०२६ पर्यंत एका शैक्षणिक सत्रासाठी निलंबित केले आहे.
Professor Sarovar Zaidi suspended for 6 months for harassing a student who praised the ‘Surgical Strike’ at O.P. Jindal Global University in Sonipat, Haryana
The Professor had also compared PM Narendra Modi to Hitler.
It says it all when a professor gets an eyesore over the… pic.twitter.com/PWQhrGwwHa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 1, 2026
१. पदवीधर विद्यार्थी विख्यात याचे वडील विश्व बजाज यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये हरियाणा मानवाधिकार आयोगासमोर यासंबंधी तक्रार केली होती. तक्रारीत बजाज यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलाला २ प्राध्यापकांचा छळ सहन करावा लागला. त्यांच्या मुलाने ३१ ऑक्टोबर २०२५ या दिवशी ‘यूआर्आय : द सर्जिकल स्ट्राईक’ नावाचा निबंध लिहिला होता. दोन्ही शिक्षकांना हा निबंध आवडला नाही आणि त्यांनी ३ नोव्हेंबर २०२५ या दिवशी त्यांच्या मुलाला त्रास दिला.
२. बजाज यांनी असेही म्हटले की, त्यांच्या मुलाला झैदी यांनी शिकवलेल्या ‘राजकारणाचे प्रतिनिधित्व’ या अभ्यासक्रमाच्या वेळी वारंवार राजकीयदृष्ट्या अपमानास्पद, प्रक्षोभक आणि त्रासदायक अशा टिपण्यांना तोंड द्यावे लागले. प्राध्यापकाच्या टीकेमध्ये भारताच्या पंतप्रधानांची अॅडॉल्फ हिटलरशी तुलना करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा कारवायांचे वर्णन पंतप्रधानांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी म्हणून करणे, अशा गोष्टींचा समावेश होता. पंतप्रधान मोदी, आणि भारतीय सैन्य यांचे कौतुक केल्यावरून काही प्राध्यापक जाणूनबुजून मुलाला लक्ष्य करू लागले. त्यांनी जाणूनबुजून परीक्षेत मुलाचे गुण न्यून केले, ज्यामुळे तो विषयात अनुत्तीर्ण झाला.
३. याविशयी बजाज यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार केल्यावर झालेल्या चौकशीत विख्यात याचे परीक्षेतील गुण अन्याय्य पद्धतीने कापले गेले होते, हे समोर आले. नंतर विद्यापीठाने विख्यात याला परीक्षेचा सुधारित निकाल दिला.
४. या घटनेविषयी विद्यापिठाचे मुख्य संपर्क अधिकारी अंजू मोहून म्हणाले की, हरियाणा मानवाधिकार आयोग या प्रकरणाचा विचार करत आहे आणि विद्यापीठ आयोगाच्या निर्देशांचे पालन करत आहे. १६ जानेवारी २०२६ या दिवशी आयोगाने सोनीपत पोलीस आयुक्त आणि विद्यापीठ रजिस्ट्रार यांच्याकडून अहवाल मागितले आहेत.
संपादकीय भूमिका
|

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !