भारतीय ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) संरचना : स्वयंपूर्णता, सक्षमता आणि कार्यक्षमता यांचा मार्ग !

भारताच्या नेतृत्वाची जग आता नोंद घेणार !

सध्या जगभरात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय – कृत्रिम बुद्धीमत्ता)च्या क्षेत्रात मोठी स्पर्धा चालू आहे. ही प्रगती मोजण्यासाठी प्रचंड वीज आणि अफाट ‘डेटा’चा (माहितीचा) वापर केला जात आहे. यामुळे एक असा अडथळा सिद्ध झाला आहे, जिथे फक्त श्रीमंत देश किंवा आस्थापनेच टिकू शकतात. भारतासाठी हे धोक्याचे आहे; कारण जर आपण परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहिलो, तर आपण कायम त्यांच्यावर विसंबून राहू. हा अहवाल भारतासाठी एक ‘तिसरा मार्ग’ सुचवतो, ‘परदेशी तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा स्वतःचे ‘स्वदेशी एआय’ सिद्ध करणे.

१. बुद्धीमत्तेचे केंद्रीकरण

अ. संगणकीय शक्ती आणि ‘डेटा’चे अडथळे : ‘एआय’ सिद्ध करण्यासाठी २ मोठे अडथळे आहेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

आ. हार्डवेअरचा अडथळा : शक्तीशाली ‘एआय’ मॉडेल बनवण्यासाठी सहस्रो ‘जी.पी.यू.एस्.’ (प्रगत चिप्स) लागतात. भारताला या ‘चिप्स’ मिळवण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे हे काम महाग आणि कठीण झाले आहे.

इ. ‘डेटा’चा अडथळा : इंटरनेटवरील माहिती आता खासगी होत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचा ‘डेटा’ आहे, तेच आता शक्तीशाली आहेत.

ई. भारतीय भाषांची कमतरता : सध्याचे ‘एआय’ मॉडेल्स पाश्चात्त्य विचारांवर आधारित आहेत. भारताची प्रमुख भाषा असलेल्या हिंदीचा वाटा जागतिक ‘डेटासेट’मध्ये १ टक्क्यापेक्षाही अल्प आहे. जोपर्यंत आपण आपल्या भाषांमध्ये ‘एआय’ बनवत नाही, तोपर्यंत त्याचा लाभ सामान्य भारतियांना होणार नाही.

२. ‘इंडिया ‘एआय’ मिशन : स्वयंपूर्णतेकडे पाऊल

वर्ष २०२६ च्या प्रारंभीला भारत सरकारने यासाठी १० सहस्र ३७१ कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. फेब्रुवारी २०२६ पर्यंतची प्रगती पुढीलप्रमाणे :

अ. संगणकीय शक्ती : ३८ सहस्र ‘जी.पी.यू.एस्.’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि ‘स्टार्टअप्स’ना ते सवलतीच्या दरात (रुपये ६५ प्रति घंटा) दिले जात आहेत.

आ. स्वदेशी मॉडेल्स : ‘सर्वम् एआय’ आणि ‘ग्यान एआय’ यांसारख्या १२ संस्थांची निवड मॉडेल्स बनवण्यासाठी केली आहे.

इ. भारत-जेन : ‘आयआयटी बॉम्बे’च्या (भारतीय तंत्रज्ञान संस्था) नेतृत्वाखाली भारतीय संस्कृती आणि भाषा समजणारे ‘एआय’ विकसित केले जात आहे.

३. मोठा वाद : नवीन मॉडेल कि सुधारित मॉडेल ?

अ. स्वतःचे मॉडेल बनवणे : काहींच्या मते परकीय देशांवर अवलंबून राहू नये; म्हणून शून्यापासून (प्रथमपासून) स्वतःचे मॉडेल बनवणे आवश्यक आहे.

आ. सुधारित मॉडेल : डॉ. विद्यासागर यांच्यासारख्या तज्ञांच्या मते शून्यापासून मॉडेल बनवण्यापेक्षा जगात उपलब्ध असलेल्या ‘ओपन सोर्स’ मॉडेल्सना भारतीय आवश्यकतांनुसार सुधारणे (फाईन ट्यून) अधिक सोपे आणि स्वस्त आहे.

डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय : ‘एआय’ आधारित शाश्वत शेती !

कृषीप्रधान महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर केवळ अनुदानाची मलमपट्टी न करता तंत्रज्ञानाच्या जोरावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘एआय’ परिषद आयोजित करून महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून ही घटना राज्यासाठी एक महत्त्वाची धोरणात्मक दिशादर्शक ठरणार आहे.

महाराष्ट्र हा ऐतिहासिक काळापासून कृषीप्रधान प्रदेश राहिला आहे. आजही राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत उद्योग आणि सेवा क्षेत्रांची भरारी मोठी असली, तरी ग्रामीण महाराष्ट्राचा कणा आजही शेतीच आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब आणि कांदा अशा विविध पिकांमुळे राज्याची कृषीरचना वैविध्यपूर्ण आहे; मात्र हवामानातील अनिश्चितता, पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन व्यय अन् बाजारपेठेतील अस्थिरता यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

१. तंत्रज्ञान : शहरांची मक्तेदारी नाही !

पावसावर अवलंबून असलेली शेती, मराठवाडा-विदर्भातील दुष्काळी चक्र आणि कोकणातील अतीवृष्टी यांमुळे शेती ही व्यवसायापेक्षा ‘जोखमी’ची अधिक वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पार पडलेली ‘राज्यस्तरीय कृषी एआय परिषद’ केवळ प्रतीकात्मक नाही. देहलीतील राष्ट्रीय परिषदेनंतर अवघ्या काही दिवसांतच महाराष्ट्राने हे पाऊल उचलून एक स्पष्ट संदेश दिला आहे, ‘तंत्रज्ञान ही केवळ शहरांची किंवा आयटी पार्कची मक्तेदारी नाही. कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ आता थेट शेताच्या बांधापर्यंत पोचवण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे.’

२. कृषी क्षेत्रात ‘एआय’चे नेमके काम काय ?

कृत्रिम बुद्धीमत्ता, म्हणजे केवळ संगणकीय प्रणाली नसून तो मोठ्या प्रमाणावरील ‘डेटा’चे विश्लेषण करून अचूक निर्णय घेणारा मेंदू आहे.

अ. अचूक सल्ला : भूमीचा पोत, आर्द्रता, तापमान आणि पर्जन्यमान यांची माहिती एकत्र करून ‘एआय’ शेतकर्‍यांना योग्य पीक निवडीचा सल्ला देऊ शकते.

आ. वाण संशोधन : हवामानातील पालटांना तोंड देणार्‍या बियाण्यांच्या संशोधनासाठी ‘एआय’चा वापर करून प्रक्रिया वेगवान करता येईल.

इ. मृदा विश्लेषण : प्रयोगशाळेत न जाता ‘एआय आधारित प्रणाली’द्वारे भूमीतील पोषकतत्त्वांचे अनुमान घेऊन खतांचा संतुलित वापर शक्य होईल.

३. स्मार्ट शेती आणि बाजारपेठ 

कीड-रोगांचा संसर्ग ओळखण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि ड्रोन सर्वेक्षण यांचे साहाय्य घेता येईल. ‘स्मार्ट स्प्रेईंग’ तंत्रामुळे जिथे आवश्यक आहे, तिथेच फवारणी करून व्यय वाचवता येईल. सिंचन क्षेत्रातही ‘स्मार्ट इरिगेशन’द्वारे पाण्याचा अपव्यय टाळून कोरडवाहू भागात शेती जिवंत ठेवता येईल.

सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे बाजारपेठेतील अनिश्चितता दूर करण्यासाठी ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावेल. कोणत्या पिकाला कधी मागणी असेल ? निर्यातीची संधी कुठे आहे ? आणि साठवणुकीचे नियोजन कसे करावे ? याचे शास्त्रीय मार्गदर्शन शेतकर्‍यांना मिळेल. यामुळे माहितीच्या अभावामुळे होणारी हानी टळू शकेल.

४. ‘महाॲग्री एआय’ धोरण (वर्ष २०२५-२०२९)

राज्याने आखलेल्या या धोरणात ‘कृषी डेटा बँक’, ‘स्टार्टअप्स’ आणि संशोधन संस्था यांना एकत्र आणण्याचा आराखडा आहे. ‘महाविस्तार’सारख्या ॲपद्वारे ही माहिती शेतकर्‍यांच्या भ्रमणभाषपर्यंत पोचवली जात आहे; मात्र तंत्रज्ञानाची ही क्लिष्ट भाषा शेतकर्‍यांना त्यांच्या स्थानिक भाषेत आणि सोप्या स्वरूपात समजावून सांगणे, हे प्रशासनासमोरचे खरे आव्हान असेल.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पायाभूत सुविधांसह आता कृषी क्षेत्रात जो ‘एआय’चा आयाम जोडला आहे, त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतात दिसणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ ‘ॲप्स’ असून चालणार नाही, तर डिजिटल साक्षरता आणि स्थानिक स्तरावर प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा लागेल.

५. निष्कर्ष

जुन्या ‘हरितक्रांती’ने आपल्याला अन्नधान्याविषयी स्वावलंबी केले; पण भूमीची झीज आणि रासायनिक खतांचा अतीवापर यांसारख्या समस्याही दिल्या. आताची ‘हरित एआय क्रांती’ ही शाश्वत शेतीचा मार्ग दाखवणारी आहे. ‘एआय’ ही शेतकर्‍यांची स्पर्धक नसून ती त्यांची सर्वांत मोठी ‘सहकारी’ ठरू शकते. जर याची कार्यवाही योग्य रीतीने झाली, तर महाराष्ट्रातून कृषी परिवर्तनाचा एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) (२६.२.२०२६)

४. धोरणात्मक शिफारसी

अब्जावधी रुपये व्यय न करता ‘एआय’ क्षेत्रात टिकण्यासाठी भारताने पुढील गोष्टी कराव्यात –

अ. लहान मॉडेल्सवर भर द्या ! : पुष्कळ मोठे मॉडेल बनवण्यापेक्षा शेती, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांसाठी लागणारे नेमके आणि लहान मॉडेल्स बनवा.

आ. लोकसहभागातून सुधारणा : उपलब्ध मॉडेल्सना लोकांच्या अभिप्रायातून अधिक हुशार बनवा.

इ. सरकारी पायाभूत सुविधांचा वापर : ‘एआय’ला ‘आधार’, ‘यूपीआय’ आणि ‘भाषिणी’ यांसारख्या सरकारी यंत्रणांशी जोडा.

ई. विविध गुंतवणूक : फक्त एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून न रहाता विविध पर्यायांचा विचार करा.

५. निष्कर्ष : ग्राहकाकडून निर्मात्याकडे

भारत सध्या ‘एआय’ वापरणारा जगातील तिसरा मोठा देश आहे; पण पुढचे २४ महिने ठरवतील की, आपण ‘निर्माते’ बनणार कि नाही ? खरी स्वयंपूर्णता मोठे ‘सुपर कॉम्प्युटर’ असण्यात नाही, तर आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात आहे. भारताने ‘फक्त नावासाठी’ प्रकल्प करण्यापेक्षा ‘लोकांच्या कामाचे’ प्रकल्प केल्यास आपण जगाचे नेतृत्व करू शकतो.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे (२४.२.२०२६)

संपादकीय भूमिका

भारताने ‘फक्त नावासाठी’ प्रकल्प करण्यापेक्षा ‘लोकांच्या कामाचे’ प्रकल्प केल्यास आपण जगाचे नेतृत्व करू शकतो !