तस्करीसाठी आलिशान गाडीचा वापर
चिपळूण – तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) परिसरात एका आलिशान गाडीतून गायीची तस्करी करण्यात आली आहे. गोवंशियांची तस्करी करण्यासाठी काळ्या रंगाच्या झायलो गाडीचा गोतस्करांनी वापर केला. तस्करांनी सुमारे १० सहस्र रुपये किमतीची एक तांबडी गाय पळवून नेली आहे.
१. फिर्यादी सचिन पावसकर हे मुंबईहून गावी परतले असतांना त्यांना घरासमोर एक संशयास्पद झायलो गाडी दिसली. त्यांनी तातडीने गावातील ७-८ मित्रांना बोलावले. ग्रामस्थ दबा धरून बसले असतांना त्यांना गोवंशियांच्या हंबरण्याचा आवाज आला. ग्रामस्थ त्या दिशेने धावताच तस्करांनी गाडी वेगाने पळवून नेली.
२. ग्रामस्थांनी त्यांच्या बोलेरो गाडीने तस्करांचा पाठलाग केला. पाठलागाच्या वेळी ग्रामस्थांनी दगडफेक करून झायलो गाडीची मागील काचही फोडली; मात्र तस्कर लोटे एम्.आय.डी.सी.च्या दिशेने पळून गेले.
३. तस्कर पसार झाल्यानंतर घटनास्थळाची पहाणी केली असता तिथे ४ गायी आणि १ बैल अशी एकूण ५ जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळली. तस्करांनी या गोवंशियांना गुंगीचे औषध दिले होते, जेणेकरून ते शांत राहतील आणि त्यांची सहज तस्करी करता येईल. सध्या या गोवंशियांवर उपचार चालू आहेत.
४. चिपळूण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने तस्करांचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकागोतस्कर तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात गोहत्याविरोधी कायदा असूनही त्यांना कायद्याचा धाक नसल्यामुळे असले प्रकार घडत आहेत ! |
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !