भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वर्षभरापूर्वीच तक्रार !
दर्ग्याकडून ३१ लाख रुपयांच्या अनधिकृत विजेचा वापर !

मुंबई – गोरेगाव (पूर्व) येथील आरे वसाहत परिसरात सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट केला. महानगरपालिका आणि संबंधित विभागाचे संयुक्त पथक यांनी ही कारवाई केली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी १०० हून अधिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक, तसेच अन्य पथके तैनात होती. संबंधित बांधकाम सरकारी भूमीवर उभारण्यात आले होते. यापूर्वी महानगरपालिकेकडून बांधकामाला नोटीस बजावून ते हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र निर्धारित समयमर्यादेत कारवाई न झाल्याने प्रशासनाने वरील कारवाई केली.
🚨 Illegal dargah on government land in Aarey Colony, Goregaon demolished.
BJP leader @KiritSomaiya had raised the issue and lodged a complaint nearly a year ago.
⚡ The dargah allegedly consumed electricity worth ₹31 lakh without authorisation.
Why did authorities take so… pic.twitter.com/zJeZXUEtth
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात मी वर्षभरापूर्वीच तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.’’ आरे वसाहतीचे सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांनी जानेवारी २०२६ मध्ये प्रविष्ट केलेल्या तक्रारीत आरोप केला होता की, गेल्या १० वर्षांपासून या दर्ग्यात विजेचा अनधिकृतपणे वापर केला जात होता. ७७ सहस्रांहून अधिक युनिट्स वीज या अंतर्गत वापरली गेली आहे. त्या विजेचे मूल्य साधारण ३१ लाख रुपये इतके आहे.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !