HC Stays Kerala Story Sequel : ‘द केरल स्टोरी २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला न्यायालयाकडून १५ दिवसांसाठी अंतरिम स्थगिती

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरल स्टोरी – २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर १५ दिवसांसाठी अंतरिम स्थगिती दिली. हा चित्रपट उद्या, २७ फेब्रुवारी या दिवशी प्रदर्शित होणार होता.

न्यायालयाने नमूद केले की, पहिल्या दृष्टीक्षेपात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) चित्रपटाला प्रमाणपत्र देतांना आवश्यक ती काळजी घेतलेली दिसत नाही.