
प्रश्न :
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘पूर्वी माझ्या दोन्ही हातांच्या बोटांचा गंध घेतल्यास डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताच्या बोटांना अधिक सुगंध येत आहे’, असे मला जाणवत असे. मधल्या काही काळात माझ्या केवळ डाव्या हाताच्या बोटांना दुर्गंधही येत असे. आज माझ्या दोन्ही हातांच्या बोटांचा गंध घेतल्यावर दोन्ही हातांच्या बोटांना सुगंध येत होता. त्यातही डाव्या हाताच्या बोटांना उजव्या हाताच्या बोटांच्या तुलनेत ३० टक्के अधिक प्रमाणात सुगंध येत होता. याचे कारण काय ? (२५.४.२०२२)
उत्तर :
श्री. राम होनप :
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना दैवी सुगंध येण्याचे कारण

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पुष्कळ साधना आणि भक्ती असल्याने त्यांच्या शरिरात ईश्वरी शक्तीचा स्रोत अखंड कार्यरत असतो. या ईश्वरी शक्तीद्वारे समष्टीचे विविध अंगांनी कल्याण होत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील ईश्वरी शक्तीमुळे त्यांच्यातील पृथ्वीतत्त्व शुद्ध होऊन ते चैतन्यमय झाले आहे. पृथ्वीतत्त्वात सुगंधी दैवी शक्ती असते. तिला ‘गंधश्री’, असे म्हणतात. यात ‘गंध’ याचा अर्थ श्रीविष्णूचे तत्त्व आणि ‘श्री’, याचा अर्थ ‘शक्ती’ असा आहे. दैवी सुगंधामध्ये श्रीविष्णूची गंधमय शक्ती असते. त्यामुळे तिला ‘गंधश्री’, असे म्हणतात. या सुगंधी दैवी शक्तीमुळे ‘साधकांना प्राणशक्ती मिळणे, वातावरणात रज-तमामुळे निर्माण झालेला दुर्गंध नष्ट होणे, वाईट शक्तींचा जोर न्यून होणे’ इत्यादी कार्ये घडतात.
२. बोटांद्वारे दैवी सुगंध प्रगट होण्याची प्रक्रिया
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शरिरात निर्माण झालेली दैवी सुगंधी शक्ती त्यांच्या हातांच्या बोटांशी संबंधित रक्तपेशींमध्ये मिसळते. ही शक्ती बोटांच्या त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे प्रगट होते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बोटांना दैवी सुगंध येऊन तो वातावरणात पसरतो आणि त्यातून सूक्ष्मातील कार्य घडते.
तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना काही काळ दैवी गंध येतो आणि त्याचे प्रमाण अल्प-अधिक होते, तसेच त्यांच्या हाताच्या बोटांना काही काळ दुर्गंधही येतो. त्यांच्या देहात घडणार्या अशा बुद्धीअगम्य घटनांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. खालील लिखाण ही कल्पना नसून साधकाला मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान आहे. समाजाला या सूक्ष्मातील नवीन पैलूंची माहिती व्हावी, यासाठी हे ज्ञान प्रसिद्ध करत आहोत. आम्हालाही हा विषय नवीनच आहे. या संदर्भात ‘तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे’, यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’
ई-मेल : [email protected]
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
३. डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताच्या बोटांना अधिक सुगंध येण्याचे कारण
शरिराच्या उजव्या बाजूला सूर्यनाडी, तर डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. वाईट शक्तींची सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर आक्रमणे होतात. तेव्हा त्यांच्या सूर्यनाडीतील पृथ्वीतत्त्वाचे प्रगटीकरण आणखी वाढते. शुद्ध स्वरूपाच्या पृथ्वीतत्त्वात दैवी गंधाचा वास असतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उजव्या बोटांना दैवी सुगंध येण्याचे प्रमाण वाढते. त्या तुलनेत त्यांच्या चंद्रनाडीतील पृथ्वीतत्त्वातील दैवी सुगंधी शक्तीचे प्रगटीकरण अल्प असते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताच्या बोटांना अधिक दैवी सुगंध येतो.
४. काही काळ केवळ डाव्या हाताच्या बोटांना दुर्गंध येण्याचे कारण
अनिष्ट शक्ती चिडून कधीकधी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बोटांवर सूक्ष्मातून तीव्र आक्रमणे करतात. तेव्हा त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बोटांचा दैवी सुगंध नष्ट करण्यासाठी त्यावर दुर्गंधीयुक्त वायूचा मारा करतात. अशा अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा प्रभाव अधिक असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या बोटांना काही काळ दुर्गंध येतो.
५. डाव्या हाताच्या बोटांना उजव्या हाताच्या बोटांच्या तुलनेत ३० टक्के अधिक प्रमाणात सुगंध येण्याचे कारण
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डाव्या बाजूची चंद्रनाडी शीतल आणि सौम्य आहे. त्या तुलनेत त्यांच्या उजव्या बाजूच्या सूर्यनाडीद्वारे ईश्वरी शक्तीचे प्रक्षेपण पुष्कळ होत असते. त्यामुळे अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उजव्या बोटांवर होण्याच्या तुलनेत त्यांच्या डाव्या बोटांवर अधिक होतो. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील ईश्वरी शक्ती डाव्या बाजूने आणखी प्रगट होते. हे सूक्ष्म युद्ध अनिष्ट शक्तींचा जोर न्यून होईपर्यंत चालू रहाते. परिणामी त्या वेळी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना उजव्या हाताच्या बोटांच्या तुलनेत ३० टक्के अधिक प्रमाणात सुगंध येतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १५.११.२०२५, वेळ रात्री ९ आणि एकूण कालावधी २० सेकंद)
|
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !