|

जम्मू-काश्मीर – किश्तवाडमधील छात्रू येथे झालेल्या आतंकवादविरोधी मोहिमेत भारतीय सैन्याचा श्वान ‘टायसन’ याने मोठी कामगिरी बजावली. मोहिमेच्या वेळी टायसनने आतंकवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा अचूक माग काढला, तसेच चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांची पहिली गोळीही त्यानेच झेलली. या चकमकीच्या वेळी ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेचा कमांडर ठार झाला.
आतापर्यंत अनेक मोहिमांमध्ये सैन्यातील श्वानांनी महत्त्वाची भूमिका निभावत स्वतःचा जीव धोक्यात घालून सैनिकांना साहाय्य केले आहे. या श्वानांनी देशासाठी रक्तही सांडले आहे.
१. २८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी अखनूर क्षेत्रात आतंकवादविरोधी मोहिमेच्या वेळी झालेल्या गोळीबारात ‘फॅन्टम’ या श्वानाने देशासाठी बलीदान दिले होते.
२. सप्टेंबर २०२३ मध्ये राजोरी येथे झालेल्या चकमकीत ‘केंट’ या मादी ‘लेब्राडोर’ जातीच्या श्वानानेही सर्वोच्च बलीदान दिले होते. आतंकवाद्यांचा पाठलाग करत ‘केंट’ या मोहिमेचे नेतृत्व करत होती, तेव्हाच अचानक गोळीबार चालू झाला आणि सैनिकांचे रक्षण करण्यासाठी ‘केंट’ने स्वतः गोळी झेलत प्राण अर्पण केले.
३. भारतीय सैन्यातील या मूक योद्ध्यांचे शौर्य आणि निष्ठा सैन्याच्या प्रत्येक मोहिमेचे मोठे बळ आहे.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती