
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सत्तापालटानंतर महंमद युनूस पदावरून पायउतार झाले आणि पंतप्रधानपदी तारिक रहमान विराजमान झाले. तरीही देशातील हिंदु अल्पसंख्यांकांसाठी परिस्थितीत कोणताही पालट झालेला नाही. हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. चांदनीपूर येथे एका दिव्यांग (विकलांग) हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. हा गुन्हा करणारे रकीब, सोहेल आणि रसेल मोकाट फिरत असल्याचे सांगितले जात आहे. याखेरीज गायकबांधा येथे एका हिंदु अधिवक्त्याची कुर्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याचीही घटना घडली आहे.
Brutal reality in Bangladesh 🚨
A Hindu woman gang-raped in Chandipur.
A Hindu advocate hacked to death with an axe in Gaibandha.
Even after elections and results, violence against Hindus continues.
If PM-elect Tariq Rahman calls these “political killings,” accountability… https://t.co/LTz1rdVHy3 pic.twitter.com/Rptm6sPJ5i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 25, 2026
१. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय पीडित हिंदु महिलेने सांगितले की, २२ फेब्रुवारीला रात्री ९ च्या सुमारास कीर्तनावरून परतत असतांना ३ मुसलमान तरुणांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
२. गायकबांधा येथे ४० वर्षीय हिंदु अधिवक्ता अमिताभ चंद्र सुजन यांची मुसलमानांनी त्यांच्या निवासस्थानी घुसून कुर्हाडीने वार करून हत्या केली. ‘बी.एन्.पी.’च्या विजयानंतर लगेचच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
संपादकीय भूमिकानिवडणुका आणि त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही बांगलादेशात हिंदूंच्या हत्या होतच आहेत. त्यामुळे ‘हिंदूंच्या हत्या या राजकीय हत्या’ असल्याचा दावा करणारे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांना आता यावरून जाब विचारला पाहिजे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला आतातरी फैलावर घ्यावे, असे भारतातील हिंदूंना वाटते ! |
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड