
सरस्वतीदेवी ही बुद्धी, ज्ञान, कला आणि वाणी यांची अधिष्ठात्री देवी आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरित्र अभ्यासले, तर ‘त्यांचे जीवन हे सरस्वतीदेवीच्या कृपेचे उदाहरण आहे’, हे लक्षात येते. अगदी शालेय जीवनापासून ते आजतागायत त्यांच्यावर सरस्वतीदेवीची कृपा असल्याने त्यांनी विविध क्षेत्रांत विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रगती केली.

१. विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूपता
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे मन आणि बुद्धी सामान्य मानवी स्तरावर नसून ते थेट विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झाले आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण विश्वातील विचार आणि ज्ञान ग्रहण करता येते. अध्यात्मातील वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यासाठी त्यांनी या ज्ञानाचा वापर केला आहे.

२. दैवी ज्ञानाची प्राप्ती आणि ग्रंथनिर्मिती
सरस्वतीदेवीच्या कृपेमुळेच त्यांना ‘दैवी ज्ञान’ प्राप्त झाले असावे. त्यांनी अध्यात्म आणि जीवन जगण्याचे विविध पैलू यांवर नोव्हेंबर २०२५ पर्यंत ३६८ ग्रंथ संकलित केले आहेत अन् आणखी ५,००० ग्रंथ संकलित होणे शेष आहे. या ग्रंथांमधून त्यांनी मानवजातीसाठी आवश्यक असलेले सूक्ष्म आणि मूलभूत ज्ञान उपलब्ध करून दिले आहे.
सरस्वतीदेवी केवळ ज्ञान देत नाही, तर ज्ञानदान करण्याची क्षमताही प्रदान करते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांच्याकडील दैवी ज्ञान साधकांना, तसेच समाजाला उपलब्ध करून दिले आहे. हे ज्ञान पुढील अनेक पिढ्यांसाठी उपलब्ध राहील. त्यांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवू शकणारे साधकही सिद्ध केले. हे ज्ञानदानाचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर असलेल्या सरस्वतीदेवीच्या कृपेची साक्ष देते.

३. कलांविषयी अमूल्य ज्ञान अवगत असणे आणि कलांविषयीचे शिक्षण देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करणे
सरस्वतीदेवी ही विविध कलांची देवता आहे. तिच्या कृपेमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना केवळ आध्यात्मिक ज्ञानच नव्हे, तर नृत्यकला, संगीतकला, पाककला, वास्तूकला, चित्रकला, अशा विविध कलांचे आध्यात्मिक आणि मूलभूत ज्ञान प्राप्त झाले आहे. ‘या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करावी ?’, हे त्यांनी साधकांना शिकवले आहे. विशेष म्हणजे ‘त्यांनी व्यावहारिकदृष्ट्या कोणत्याही कलेचे शिक्षण घेतले नसतांनाही त्यांना अनेक कलांविषयी अमूल्य ज्ञान अवगत आहे’, हे सरस्वतीदेवीचा त्यांच्यावर ‘वरदहस्त’ असल्याचे दर्शवते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हे ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवलेले नाही. त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयात केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या आणि सात्त्विकता वाढवणार्या सर्व कलांचे शिक्षण दिले जात आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे हे कार्य, म्हणजे सरस्वतीदेवीचे ‘विद्या’ आणि ‘कला’ या क्षेत्रांतील वरदानच आहे’, असे वाटते.
४. वाणीत चैतन्य आणि ऊर्जा असल्याने बोलण्यातून साधकांना योग्य दिशा अन् प्रेरणा मिळणे
सरस्वतीदेवीला ‘वाग्देवी (वाणीची देवी)’, असेही म्हणतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘वाणीवर मिळवलेले प्रभुत्व’, हा तिच्या आशीर्वादाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची वाणी चैतन्यमय आहे. त्यांच्या शब्दांमध्ये केवळ माहिती नसते, तर ऊर्जा असते. ही ऊर्जा त्यांचे बोलणे ऐकणार्याचे मन आणि बुद्धी यांवर सकारात्मक परिणाम करते. त्यांची चैतन्यदायी वाणी साधकांना योग्य दिशा आणि प्रेरणा देते.
यावरून ‘योगतज्ञ प.पू. दादाजींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी काढलेले वरील उद्गार ही केवळ त्यांची स्तुती नव्हती, तर त्यांचे असाधारण दैवी कार्य स्पष्ट करणारे सत्यवचन होते’, हे लक्षात येते.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२५)
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !