‘अफगाण डायस्पोरा नेटवर्क’ संघटनेच्या अहवालातून उघड
काबुल – पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे, हे ‘अफगाण डायस्पोरा नेटवर्क’च्या अहवालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पाकिस्तानी सैन्य हमास आणि मुस्लिम ब्रदरहुड यांसारख्या कट्टरतावादी इस्लामी संघटनांना त्याच्या देशात कार्यरत रहाण्यासाठी जागा देत आहे आणि त्यांना साहाय्यही करत आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांसारख्या स्थानिक आतंकवादी संघटनांनाही पाकिस्तानी सैन्याकडून वैचारिक आणि धोरणात्मक पाठबळ मिळत आहे, असा दावा ‘अफगाण डायस्पोरा नेटवर्क’च्या अहवालात करण्यात आला आहे. (यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. आतातरी जागतिक समुदाय पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करणार का ? – संपादक)
दक्षिण आशियातील अस्थिरतेविषयी चेतावणी
पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे दक्षिण आशियातील आधीच अस्थिर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये नव्या संघर्ष आणि हिंसाचार यांच्या शक्यता निर्माण होऊ शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या आतंकवादी संघटनांवर बंदीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह !
आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांवर बंदी घातल्याचा दावा केला असला, तरी सहयोगी संस्था आणि आघाडी संघटना यांच्या माध्यमातून हे गट आजही सक्रीय असल्याचे अहवालात म्हटले आहे. अलीकडील काळात पाकिस्तानातील राजकीय आणि धार्मिक मंचांवर हमासच्या प्रतिनिधींची उपस्थिती दिसून येत आहे. यावरून त्यांना केवळ प्रचारासाठी व्यासपीठ दिले जात नाही, तर व्यापक जाळे उभारण्यासाठीही पाकिस्तानचे साहाय्य मिळत असल्याचे संकेत मिळतात. (हा अहवाल संयुक्त राष्टांसमोर मांडून भारताने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करावा आणि पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करण्याची मागणी करावी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाया अहवालात नवीन असे काहीच नाही. आतापर्यंत जगभरातील अनेक संघटनांनी असे म्हटले आहे; मात्र महासत्ता म्हणवून घेणारे अमेरिका आणि चीन यांसारखे देश पाकिस्तानला पाठीशी घालतात, ही जगासाठी मुख्य समस्या आहे ! |

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी