Trump Tariffs : २४ घंट्यांत आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले !

अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही डॉनल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय

डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना अमेरिकी कायद्यानुसार आयात शुल्क लावण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी सर्व देशांवरील आयात शुल्क १० टक्के केले होते; मात्र याला २४ घंटे उलटण्यापूर्वीच ट्रम्प यांनी त्यात वाढ करून ते १५ टक्के करण्याची घोषणा केली. मुळात न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांना आयात शुल्काविषयी कोणताही निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार नसतांना त्यांनी काल १० टक्के कर लावला आणि आता तो १५ केला. न्यायालयाच्या निर्णयाचा विचार केला, तर हा कर पूर्वीप्रमाणेच म्हणचे साडेतीन टक्के करणे आवश्यक आहे.

२४ फेब्रुवारीपासून लागू होणार आयात शुल्क

ट्रम्प यांनी एका आदेशावर स्वाक्षरी करून जगभरातील देशांवर १५ टक्के शुल्क लावले आहे. हे शुल्क २४ फेब्रुवारीपासून लागू होईल आणि तो नियमानुसार पुढचे १५० दिवस असेल.

संपादकीय भूमिका

अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाचा थेट अवमान केला जात असतांना ट्रम्प यांना कुणीही जाब विचारत नाही, हे भारतियांसाठी आश्चर्यच होय ! अशी हुकूमशाही व्यवस्था असणारी अमेरिका ट्रम्प यांच्या काळात दिवाळखोर न झाल्यासच आश्चर्य !