केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

आगरतळा (त्रिपुरा) – घरात मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधल्यास त्यांचा संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध रहातो. मुलांनी त्यांच्या मातृभाषेची योग्य ओळख ठेवण्यासाठी पालकांनी घरी ती भाषा बोलणे आवश्यक आहे. घरातील संभाषण मातृभाषेत नसल्यास मुले त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर होऊ शकतात, असे मार्गदर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे राजभाषा संमेलनात केले.
Language is our identity! 🗣️✨
Union Home Minister Amit Shah urged families to speak to children in their mother tongue at home, warning that losing it can disconnect future generations from their literature, history & traditions.
Preserve your roots. Protect your language.… pic.twitter.com/nfB614bueW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2026
गृहमंत्री शहा पुढे म्हणाले की,
भाषा आणि लिपी यांच्या वापरावर राजकारण करणे टाळले पाहिजे. भाषा हे मुलांच्या विचारशक्ती, आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळख यांचे प्राथमिक साधन असल्याने मातृभाषा जपली गेली पाहिजे. सरकार प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्यावर भर देत आहे, ज्यामुळे भाषा आणि परंपरा कायम ठेवण्यास साहाय्य होईल.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा