
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय वंशाचे अधिवक्ता नील कत्याल यांनी अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयात लढाई लढल्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या जागतिक व्यापारावरील आयात शुल्काचा निर्णय रहित झाला. ट्रम्प यांनी ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट’चा (‘ईपा’चा) वापर करून आयात शुल्क लावले होते. नील कत्याल यांनी याला न्यायालयात आव्हान दिले होते. या निकालानंतर कत्याल यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष शक्तीशाली असतात; पण आमची राज्यघटना त्यापेक्षा अधिक शक्तीशाली आहे.
नील कत्याल यांनी केलेला युक्तीवाद
१. वर्ष १९७७ च्या ईपा कायद्यात ‘आयात शुल्क’ किंवा ‘कर’ या शब्दांचा कुठेही उल्लेख नाही.
२. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार कर लावण्याचा आणि व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही.
अधिवक्ता नील कत्याल यांचा परिचय !
नील कत्याल यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील इंजिनिअर, तर आई डॉक्टर आहे. ‘येल लॉ स्कूल’मधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लिपिक म्हणून काम केले. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात त्यांनी कार्यकारी सॉलिसिटर जनरल म्हणून दायित्व सांभाळले होते. अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयात ५० पेक्षा अधिक वेळा युक्तीवाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !