|
जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू विभागाच्या ‘आर्.एस्. पुरा सेक्टर’मधील बालनिरीक्षण केंद्रामधून ३ कैदी पळून गेले. या अल्पवयीन गुन्हेगारांपैकी एकाकडे पिस्तुल होते, तसेच यांतील २ जण पाकिस्तानी आहेत. त्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात २ पोलीस घायाळ झाले. ही घटना १६ फेब्रुवारीच्या दुपारी सव्वा पाच वाजता घडली. पोलीस उपनिरीक्षक विनय कुमार आणि मुख्य हवालदार परवीन कुमार अशी घायाळ झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, बाल निरीक्षण केंद्राच्या देखरेखीमध्ये निष्काळजीपणा झाल्याने ही घटना घडली. या प्रकरणी ६ पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, कैद्याकडे पिस्तूल कुठून आले आणि त्यातून किती गोळ्या झाडण्यात आल्या.
विशेष म्हणजे बालसुधारगृहातून पळून गेलेल्या ३ कैद्यांपैकी एकाची आईही बेपत्ता आहे. महिलेच्या बेपत्ता होण्यामागील परिस्थिती संशयास्पद मानली जात आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक अन्वेषणानुसार महिलेचे गायब होणे, हे अलीकडील कारागृहातून पळून जाण्याशी संबंधित एका मोठ्या कटाचा भाग असू शकते.
कठुआ : जैश-ए-महंमदचे ५ आतंकवादी सक्रीयजम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. हे सर्व आतंकवादी अलीकडेच कठुआ जिल्ह्यात घुसले आहेत. पाकिस्तानातून प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून ते सीमावर्ती भागात सक्रीय आहेत. |
संपादकीय भूमिका
|

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !