आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली भीती

गौहत्ती (आसाम) – आसामची सद्य:स्थिती फारशी चांगली नाही. आसाममधील मुसलमानांच्या लोकसंख्येचा मोठा भाग बांगलादेशातून बेकायदेशीररित्या आला आहे. ही घुसखोरी मुख्यत्वे त्या काळात झाली, जेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्या सरकारांनी सीमांचे योग्य निरीक्षण केले नाही. त्यामुळे राज्यातील लोकसंख्यात्मक संतुलन बिघडले. बेकायदा घुसखोरी ही आसाम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशासमोरील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. भविष्यात कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत राज्यातील काही जण बांगलादेशाला पाठिंबा देऊ शकतात, ज्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता आसामचे मुख्यमंत्री हिबंत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, राज्याची ओळख, भूमी आणि संसाधने संरक्षित करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. यात बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी मोहिमा, सीमावर्ती भागांत देखरेख वाढवणे आणि एन्आर्सी अद्ययावत करणे यांचा समावेश आहे. सध्याचे सरकार ऐतिहासिक चुका सुधारून राज्याची सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यास कटीबद्ध आहे.
⚠️ Big Statement from Assam
Himanta Biswa Sarma has expressed serious concern that some individuals in Assam may side with Bangladesh in the event of a future conflict.
He stated that the present government is committed to correcting “historical blunders” to ensure the state’s… pic.twitter.com/HkSPLRvXXh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2026
काँग्रेस नेत्यांनी हे आरोप चुकीचे आणि समाजात फूट पाडणारे असल्याचे म्हटले आहे. हे निवेदन खर्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाअशांचा आताच शोध घेऊन त्यांना देशातून हाकलून लावण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम चालवली पाहिजे ! |
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation