‘रिमिक्स’ नको, तर सात्त्विक नामजप करा !

 

‘अलीकडे सर्वत्र ‘रिमिक्स’ पद्धतीची गाणी, भजने, मंत्र हे प्रकार पुष्कळच वाढले आहेत. ‘आधुनिक तंत्रज्ञान वापरून ‘मूळ स्वरूपातील विविध गीते, स्तोत्रे, मंत्र यांत संगणकीय ‘मेटॅलिक’ आवाज बनवणे (म्हणजे संगणकीय प्रक्रिया करून आवाज विकृत केला जाणे), भारतीय आणि पाश्चात्त्य वाद्यांची सरमिसळ करून मूळ संगीताचे नूतनीकरण करणे’, याला ‘रिमिक्स’ गीत’, असे म्हणतात. सध्या युवा पिढीमध्ये ‘रिमिक्स’ हा प्रकार अधिक प्रचलित झाला आहे. अशा प्रकारे समाजात ‘रिमिक्स’ पद्धतीचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजपही सिद्ध करण्यात आला आहे.

सात्त्विक आणि रिमिक्स नामजप यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली. या चाचणीत लक्षात आले की, ‘रिमिक्स’ पद्धतीमध्ये जपातील मूळ सात्त्विकता नष्ट होऊन नकारात्मक स्पंदने वाढतात. काळानुसार नामजप करण्याच्या योग्य पद्धतीनुसार म्हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप ऐकल्यावर नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. ‘साधना करणार्‍याने ‘रिमिक्स’ प्रकारच्या नामजपाऐवजी सात्त्विक नामजप ऐकणे’, हे त्याच्यातील सात्त्विकता वाढण्याच्या दृष्टीने लाभप्रद आहे. – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.