आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा गोळीबार करत मुसलमानांना मारण्यात येत असल्याच्या व्हिडिओचे प्रकरण
नवी देहली – निवडणुका जवळ येताच, निवडणुकीचा काही भाग सर्वोच्च न्यायालयात लढला जातो. हीच अडचण आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करतांना नोंदवले. न्यायालयाने वरील निरीक्षण मांडतांनाच या याचिकेवर सुनावणीसाठी दिनांक निश्चित करणार असल्याचे सांगितले. या याचिकेत मुख्यमंत्री सरमा यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
१. ८ फेब्रुवारीला काँग्रेसने दावा केला होता की, आसाम भाजपच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा मुसलमानांवर गोळीबार करताना दिसत आहेत. काँग्रेसने म्हटले की, हा व्हिडिओ अल्पसंख्यांकांच्या हत्येला प्रोत्साहन देण्यासारखा आहे. आता हा व्हिडिओ हटवण्यात आला आहे.
२. या व्हिडिओच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात अद्याप गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !