अमेरिकेतील टेक्सास राज्यातील रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांचे विधान
(मॉल म्हणजे मोठे व्यापारी संकुल)

टेक्सास (अमेरिका) – माझ्या मतदारसंघातील अनेक नागरिक डॅलसच्या पालटत्या सांस्कृतिक ओळखीविषयी चिंतेत आहेत. स्थानिक मॉलमध्ये गेल्यावर आपण डॅलसमध्ये नसून पाकिस्तानमध्ये आहोत, अशी भावना निर्माण होते, असे विधान अमेरिकेतील टेक्सास राज्यातील रिपब्लिकन खासदार ब्रँडन गिल यांनी केल्यावरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी हे विधान मुसलमान समुदाय आणि स्थलांतरित यांच्या विरोधात द्वेष पसरवणारे असल्याचे म्हणत टीका केली आहे.
गिल यांनी ‘रिअल अमेरिकाज व्हॉइस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनेक दशकांपासून स्थानिक कुटुंबांच्या मालकीच्या भूमींच्या आसपास मोठ्या प्रमाणावर मशिदी उभारल्या जात आहेत.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये गिल यांनी म्हटले की, व्यापक इस्लामी स्थलांतरामुळे त्यांनी ओळखलेली आणि आवडलेली अमेरिका नष्ट होत आहे.
पत्नीच्या पार्श्वभूमीवरूनही वाद
या विधानानंतर वाद अधिक तीव्र झाला; कारण ब्रँडन गिल यांच्या पत्नी डॅनियल डी’सूझा गिल भारतीय वंशाच्या आहेत. डॅनियल या प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी लेखक आणि ट्रम्प समर्थक दिनेश डी’सूझा यांच्या कन्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी पाकिस्तानच्या संदर्भातील गिल यांच्या विधानाचा संबंध त्यांच्या पत्नीच्या भारतीय पार्श्वभूमीशी जोडला. काहींनी भारत-पाकिस्तानमधील ऐतिहासिक वैर राजकीय वक्तव्यात वापरल्याचा आरोप केला.
सामाजिक माध्यमांतून एकाने उपरोधिक टिपणी करत लिहिले की, गिल यांना नवी देहलीत रहाण्याची इतकी सवय झाली आहे की, पाकिस्तानविषयी द्वेष करणे त्यांच्या स्वभावाचाच भाग बनला आहे. अनेकांनी त्यांच्या विधानाला वंशवादी आणि समाजात फूट पाडणारे ठरवले.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !