अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे माध्यम सचिव शफीकुल आलम यांचा आरोप

ढाका (बांगलादेश) – ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एैक्य परिषद’ ही संघटना आणि तिचे सदस्य माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पाळीव कुत्र्यांसारखे आहेत, असे संतप्त विधान अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे मुख्य सल्लागार आणि माध्यम सचिव शफीकुल आलम यांनी एका मुलाखतीत केला.
Tensions rise in Bangladesh 🇧🇩
Shafiqul Alam, press aide to Muhammad Yunus, ignites outrage:
• Slams minority groups as “pet dogs” of Sheikh Hasina 🐕
• Downplays anti-Hindu violence 📉
• Warns India not to treat Bangladesh like Bhutan 🚫The Counter-Argument: Critics… pic.twitter.com/mguTKEk9p5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2026
(म्हणे) ‘हिंदूंची धार्मिक द्वेषातून केवळ एकच हत्या !’
बांगलादेशातील हिंदु अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांवर बोलतांना आलम यांनी दावा केला की, गेल्या १ वर्षात धार्मिक आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांत केवळ १ हत्या झाली असून ती दीपू चंद्र दास यांची आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाकडून प्रत्येक हिंदूच्या हत्येला धार्मिक हिंसा म्हणून मांडले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हिंदु अल्पसंख्यांक समुदायाने गुन्हेगारी वाढीची माहिती घोषित केल्याबाबत विचारले असता आलम यांनी म्हटले, ‘अशा संघटनांचे नेते अवामी लीगशी संलग्न आहेत. सादर केलेल्या माहितीमधील एकही घटना धार्मिक हत्या ठरत नाही. बहुतांश प्रकरणे लूटमार किंवा वैयक्तिक वाद यांतून घडलेली आहे.’
(म्हणे) ‘भारताने बांगलादेशाला भूतान समजू नये !’
भारताने बांगलादेशाला भूतान समजू नये. (भारताने ठरवले, तर बांगलादेशाला भुकेकंगाल होऊन उपासमारीत जगावे लागेल, हे आलम यांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक) हसीना यांच्या काळात निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार झाले, तरीही कोणत्या देशाने हसीना यांना पाठिंबा दिला, हे लोकांना ठाऊक आहे. शेख हसीना देशाच्या बाहेर राहून बांगलादेशातील लोकांना भडकावत आहेत, असा दावाही आलम यांनी केला.
उस्मान हादी याची हत्या अवामी लीगच्या, म्हणजे शेख हसीना यांच्या पक्षाच्या समर्थकांनी केली आहे. उपलब्ध अहवालांनुसार अवामी लीगच्या वरिष्ठ नेत्याने हादी यांच्या हत्येसाठी निधी दिल्याचा आरोपही आलम यांनी केला.
संपादकीय भूमिका‘बांगलादेशाचे अंतरिम सरकार अमेरिकेच्या पाळीव कुत्र्यासारखे वागत आहे’, असे भारताने म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये ! |
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले