
१. मुलाच्या मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत असल्याचे निदान होणे आणि देवाच्या कृपेने ५ दिवसांतच त्याच्या प्रकृतीत सुधारणा होणे
‘माझा मोठा मुलगा श्री. सागर हेमंत म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४३ वर्षे) ११.९.२०२५ या दिवशी पहाटे ४.३० वाजता नेहमीप्रमाणे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात नामजपादी उपायांसाठी गेला होता. थोड्या वेळाने त्याला ‘आपली जीभ जड होत आहे’, असे जाणवले. त्यामुळे तो घरी परत आला आणि त्याने मला त्याविषयी सांगितले. आम्ही त्याला नेहमीच्या आधुनिक वैद्यांकडे नेले. तेव्हा त्यांनी ‘सागरला त्वरित रुग्णालयात भरती करा’, असे सांगितले. त्यानुसार आम्ही त्याला तत्परतेने रुग्णालयात भरती केले. सागरच्या उजव्या हातातील आणि पायातील शक्ती उणावली होती. आधुनिक वैद्यांच्या निदानानुसार त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत होता. तेव्हा आम्ही त्याच्या मेंदूशी संबंधित तपासण्या केल्या. त्यांच्या अहवालानुसार एक दिवस त्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नंतर पुढे ५ दिवस सामान्य विभागामध्ये त्याच्यावर उपचार चालू होते. गुरुकृपेने ५ दिवसांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला घरी सोडण्यात आले.
| सौ. वीणा म्हात्रे आणि श्री. सागर करत असलेली साधना योग्य असल्याने देवाने त्यांना अशा कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी भ्रमणभाषवरून विचारपूस केल्यावर त्यांच्या चैतन्यामुळे साधिकेवरील त्रासदायक आवरण नाहीसे होणे
१६.९.२०२५ या दिवशी रात्री सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) यांनी भ्रमणभाषवरून माझ्याकडे सागरच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. तेव्हा ‘त्यांच्या वाणीतून मिळालेल्या प्रचंड चैतन्यामुळेच माझ्यावरील त्रासदायक आवरण निघून गेले’, असे मला जाणवले.
३. सागरच्या आजारपणाच्या कालावधीत डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी मला भ्रमणभाष केला आणि सागरची विचारपूस केली. त्या वेळी ‘त्यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्याशी बोलत आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ आधार वाटला.
४. आरतीच्या वेळी ‘आरतीसाठी परिसरातील वृक्ष उभे आहेत आणि जणू नर्मदा नदीच आरतीला आली आहे’, असे जाणवणे
१७.९.२०२५ या दिवशी सकाळी मी नामजपादी उपायांसाठी देवद आश्रमात गेले होते. आरतीच्या वेळी माझे लक्ष खिडकीबाहेर गेले. तेव्हा मला जाणवले, ‘आश्रम परिसरातील वृक्ष आरतीसाठी उभे आहेत. नदीच्या लाटा आश्रमाच्या दिशेने आनंदाने हलत आहेत, जणूकाही नर्मदा नदीच आरतीला आली आहे.’
५. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत नामजपादी उपायांना बसल्यावर आलेल्या अनुभूती !
अ. २१.९.२०२५ या दिवशी मी देवद आश्रमात परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांच्या खोलीत नामजपादी उपायांना बसले होते. तेव्हा मला खोलीत सगळीकडे सूक्ष्मातून दत्ताचे अस्तित्व जाणवत होते.
आ. खोलीच्या बाहेर औदुंबराचा वृक्ष आहे. माझ्याकडून दत्ताला प्रार्थना झाली, ‘मला चैतन्य मिळू दे आणि सागरकडे तुझे लक्ष असू दे.’ प्रार्थना करत असतांनाच ‘प.पू. पांडे महाराजांनी माझ्या भोवती, तसेच कुटुंबातील सर्वांभोवती त्यांच्या हातातील काठी फिरवून आम्हाला चैतन्य दिले’, असे मला जाणवले. त्यानंतर मला पुष्कळच हलके वाटत होते.’
– सौ. वीणा हेमंत म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६९ वर्षे), देवद, पनवेल, जिल्हा रायगड. (२३.९.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !