राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेला ठणकाल्यामुळेच झाला भारत-अमेरिका व्यापार करार ! – अमेरिकी वृत्तसंकेतस्थळाचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत अमेरिकेसमवेत चालू असलेली कटुता संपवू इच्छितो आणि पुन्हा व्यापार करारावर चर्चा चालू करण्यास सिद्ध आहे. तथापि भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणार नाही. जर अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांनी कठोर भूमिका घेतली, तर भारत ट्रम्प यांच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याची वाट पाहू शकतो. भारताने यापूर्वीही अमेरिकेतील कठीण सरकारांचा सामना केला आहे, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची अमेरिकेत जाऊन भेट घेऊन त्यांना चेतावणी दिली होती. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेने भारताशी व्यापार करार करत भारतावरील आयात शुल्क ५० वरून १८ टक्के केले, असा दावा अमेरिकेतील वृत्तसंकेतस्थळ ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात करण्यात आला आहे.
India stands its ground! 🇮🇳💪
National Security Advisor Ajit Doval reportedly made it clear: India won't bow to pressure, even if it means waiting out an entire administration.
Reports suggest this "firm hand" is exactly what secured the India-US trade deal. 🤝🇺🇸#AjitDoval… https://t.co/iNUTZ6o5S0 pic.twitter.com/mfzZKTbmyc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 5, 2026
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, डोवाल यांनी असेही म्हटले होते की, भारताला असे वाटते की, ट्रम्प आणि त्यांचे सहकारी यांनी भारताविरोधात उघडपणे वक्तव्य करणे थांबवावे, जेणेकरून संबंध पुन्हा सुरळीत येऊ शकतील.
डोवाल यांच्या या चर्चेनंतर काही दिवसांतच परिस्थिती पालटू लागली. १६ सप्टेंबर या दिवशी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दूरभाष केला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर वर्षाच्या अंतापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये आणखी ४ वेळा दूरभाषवर चर्चा झाली. याच काळात दोन्ही देश कर अल्प करण्याच्या कराराच्या दिशेने वाटचाल करत राहिले.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !