रा.स्व.संघाशी निगडित असल्याने साम्यवाद्यांनी पाय कापलेले खासदार सदानंदन्् मास्टर यांचे संसदेतील विधान

नवी देहली – केरळ येथील राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले खासदार सी. सदानंदन्् मास्टर यांनी राज्यसभेत त्यांच्यावरील अत्याचारांची कथा मांडली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी त्यांनी त्यांचे दोन्ही कृत्रिम पाय पटलावर ठेवले. यानंतर ते म्हणाले की, आजपासून ३१ वर्षांपूर्वी, म्हणजे वर्ष १९९४ मध्ये केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर अमानुष अत्याचार केले होते. त्यामुळे अशा पक्षांची निष्ठा लोकशाही मूल्यांशी नसून राजकीय हिंसेशी आहे. असे असूनही ते संसदेत लोकशाही मर्यादांची भाषा करतात. राजकीय हिंसा कोणत्याही देशासाठी हिताची नसते. ती लोकशाहीला कमकुवत करते.
📢 Democracy vs Red Terror: Brutal Communist Reality Exposed
MP Sadanandan Master, who lost both legs to Communist violence for his link with the RSS, exposed their brutal reality in the Parliament.
⚔️ Living proof of red terror
🚫 Communism thrives on political violence, not… pic.twitter.com/8GDItmmuNs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2026
RS | C. Sadanandan Master moves The Motion of Thanks on the President’s Address | 02 Feb, 2026(सौजन्य : Sansad TV) |
खासदार मास्टर पुढे म्हणाले की,
१. वर्ष १९९४ मध्ये एके दिवशी बहिणीच्या विवाहाची चर्चा करून मी घरी परतत असतांना माकपच्या कार्यकर्त्यांनी मला घेरले. मला अमानुष मारहाण केली.
२. माझी चूक एवढीच होती की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होतो. आक्रमणकर्त्यांनी मला भूमीवर पाडून माझे दोन्ही पाय कापले आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
हे ही वाचा → केरळमधील ‘जिवंत हुतात्मा’ सदानंदन् मास्टर !
३. माझे पाय पुन्हा जोडणे शक्य नव्हते. त्यामुळे आज मला या कृत्रिम पायांच्या आधारावर चालावे लागत आहे.
संपादकीय भूमिकाअशी हिंसा करून लोकशाहीचा गळा घोटणार्या साम्यवादी पक्षांवर खरेतर बंदी घातली पाहिजे ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !