१५ पाक सैनिकही ठार
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात सुरक्षादलांनी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (बी.एल्.ए.ने) केलेल्या आक्रमणाच्या विरोधात कारवाई केली. पाक सैन्याने दिलेल्या माहितीनुसार विविध चकमकींमध्ये किमान ९२ जण, तर पाकिस्तानचे १५ सैनिक ठार झाले.
१. पाकने संपूर्ण बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी ३ आत्मघाती आक्रमणकर्त्यांसह ९२ बलुचिस्तान्यांना ठार करण्यात आले. पंजगुर आणि हरनाई जिल्ह्यांत‘ तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ संघटनेचे ४१ आतंकवादी मारले गेले.
२. गेल्या काही वर्षांत बलुचिस्तानमध्ये हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. इस्लामाबाद येथील ‘पाक इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज’च्या अहवालानुसार वर्ष २०२५ मध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे आणि हिंसाचार यांत ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून देशभरात ६९९ आतंकवादी घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan