
जळगाव – हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा चिरंतन धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही. याचे कारण जेव्हा रावण जन्माला येतो, तेव्हा रामही जन्माला येतो. जेव्हा कंस जन्म घेतो, तेव्हा कृष्णही अवतार घेतो, जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतात. आपल्याला केवळ चांगल्या-वाईटाच्या लढाईत सत्प्रवृत्तींच्या पाठीशी अर्थात् धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्म आणि राष्ट्र हितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी अर्थात् रामराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी १ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी दिली. सभेनिमित्त पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासह प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, विश्व हिंदु परिषदेचे जळगाव जिल्हामंत्री आणि सकल हिंदु समाजाचे राकेश लोहार आणि समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट यांनी परिषदेला संबोधित केले.
हिंदु समाजाचे प्रभावी संघटन होण्यासाठी सभा ! – प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज
हिंदु समाजाचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला जळगावमधील अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे. या सभांच्या माध्यमातून हिंदु धर्माचे आचरण केल्याने होणारे लाभ, सण उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले जाते, त्याचा लाभ सर्व हिंदूंनी घ्यावा, असे आवाहन प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले.
सभेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र, धर्म, अध्यात्म, देवता, सण-उत्सव, बालसंस्कार, आचारधर्म, व्यक्तिमत्व विकास, आयुर्वेद आदी अनेक विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचे अनमोल प्रदर्शन लावण्यात येणार आहे, त्याचा लाभ जळगावमधील सनातनी हिंदूंनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सद्गुरु जाधव यांनी केले.
या वेळी १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी एकत्रित ‘संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणतील, असे असे सकल हिंदु समाजाचे राकेश लोहार यांनी सांगितले.
३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत वाहन फेरी होणार असून ‘बिग बाजार’ (नेहरू चौक) येथून फेरीला आरंभ होऊन छत्रपती शिवराय स्मारक चौक पिंप्राळा येथे समारोप होणार आहे. |
या वर्षी सभेला प्रमुख वक्ते म्हणून ३० वर्षे सैन्यात ज्यांनी देशसेवा केलेले योद्धा लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, यांसह सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर सभेला संबोधित करणार आहेत.
या काळात २ दिवस शिवकालीन शस्त्रप्रदर्शन पहावयास उपलब्ध असणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे शहर समन्वयक श्री. गजानन तांबट यांनी केले.
संपादकीय भूमिकाजेव्हा हिंदु संघटितपणे धर्म आणि राष्ट्र हितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे ! |

ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !