नवी देहली : पाकिस्तानी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरने हमास या पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचे उघडपणे मान्य केले . त्याने हमासच्या सर्वोच्च नेत्यांससमवेत झालेल्या भेटींच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’चा कमांडर फैसल नदीम, ज्याला लष्कर-ए-तोयबाचा राजकीय चेहरा मानले जाते, त्याने एका व्हिडिओमध्ये ही स्वीकृती दिली आहे.
SHOCKING ADMISSION 🚨
Lashkar-e-Taiba commander Faisal Nadeem has openly admitted ties with Hamas leaders in Doha.
This is no allegation – it’s a confession.
Global jihad networks are openly coordinating now. ⚠️pic.twitter.com/3jfoye0hDD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 30, 2026
१. नदीमने याने सांगितले की, वर्ष २०२४ मध्ये कतारची राजधानी दोहा येथे त्याने हमासच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्याच्यासमवेत सैफुल्लाह कसुरी हाही होता. कसुरी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार मानला जातो. नदीमच्या म्हणण्यानुसार त्या दोघांनी हमासचा नेता खालिद मशाल याची भेट घेतली होती.
२. गुप्तचर यंत्रणांच्या मते, दक्षिण आशिया आणि मध्य-पूर्वेतील आतंकवादी जाळे यांच्यामधील थेट समन्वयाचा हा मोठा पुरावा आहे. तज्ञांचे असे मानणे आहे की, ही युती शस्त्रास्त्रांचा पुरवठा, खोटी माहिती पसरवणे आणि एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घेणे, यांसाठी केली गेली आहे.
पाकिस्तानमध्ये एकाच व्यासपिठावर दिसले होते हमास आणि पाक सैन्य !
७ जानेवारीला पाकिस्तानमधील गुजरानवाला येथे ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’च्या कार्यक्रमात हमास आणि तोयबाचे नेते एकत्र दिसले होते, त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात हमासचा वरिष्ठ कमांडर नाजी जहीर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होता, तर तोयबाचा कमांडर राशिद अली संधू याने राजकीय नेता म्हणून सहभाग घेतला होता. सुरक्षा अधिकार्यांच्या मते, नाजी जहीर याने ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत अनुमाने१५ वेळा पाकिस्तानचा दौरा केला आहे.
आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका
आतंकवादविरोधी तज्ञांचे म्हणणे आहे की, हमास आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यातील कोणत्याही प्रकारचा समन्वय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. गुप्तचर यंत्रणा या नवीन युतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भारत हे सूत्र आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर आणि ‘फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’ सारख्या संस्थांकडे मांडण्याच्या सिद्धतेत आहे, जेणेकरून पाकिस्तानवर कठोर कारवाई होऊ शकेल.
हमासच्या नव्या आतंकवाद्यांना पाकिस्तानमध्ये दिले जात आहे प्रशिक्षण
एका गुप्तचर अधिकार्याच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये हमासच्या नव्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना विशेष विमानांद्वारे आणले जात असून या प्रशिक्षणात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमदचे आतंकवादीही सहभागी आहेत. पाकिस्तानमध्ये असलेल्या त्याच्या ठिकाणांवर इस्रायल आक्रमण करणार नाही, असा हमासचा विश्वास असल्याने येथे कोणतीही भीती न बाळगता हालचाली चालू आहेत.
भारतासाठी का चिंतेचा विषय ?
भारतीय यंत्रणांचे मत आहे की, हमास थेट भारतावर आक्रमण करणार नसला, तरी त्याची उपस्थिती गंभीर धोका निर्माण करते; कारण हमासची तांत्रिक आणि कार्यपद्धतीची क्षमता तोयबा अन् जैश यांच्यापेक्षा अधिक प्रगत मानली जाते. प्रशिक्षणाच्या काळात हमास त्याचे अनुभव आणि आधुनिक आक्रमण यांची रणनीती या संघटनांना देत आहे. त्यामुळे भारताविरुद्ध भविष्यात मोठी आणि अधिक घातक आक्रमणे होण्याची शक्यता वाढते.
गाझाच्या नावाने देणगी आणि आतंकवादासाठी वापर
पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेने) हमासच्या नावाचा वापर करून गाझासाठी देणग्या गोळा केल्या; मात्र हा पैसा हमाससाठी खर्च करण्यात आला नाही. कोट्यवधी रुपये तोयबा आणि जैश यांचे उद्ध्वस्त तळ पुन्हा उभे करण्यासाठी वापरण्यात आले.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !