|

वॉशिंग्टन (अमेरिका) : रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध चालू होऊन साधारण ४ वर्षांचा काळ लोटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत आक्रमणे करत आहेत. एका ताज्या अहवालाने या युद्धाची भयावहता जगासमोर आणली आहे. अमेरिकेच्या एका ‘थिंक टँक’च्या दाव्यानुसार २४ फेब्रुवारी २०२२ पासून चालू असलेल्या या युद्धात आतापर्यंत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे मिळून ४ लाख ६५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनुमाने १५ लाख ३५ सहस्र सैनिक घायाळ किंवा बेपत्ता झाले आहेत.
4 years into the Russia–Ukraine war, the toll is staggering.
⚔️ 465,000 soldiers killed
🩸 1.5+ million wounded or missing – estimates by the U.S. think tank CSIS.
This bloodshed isn’t Russia’s burden alone.
Ukraine, the NATO bloc, and European arms suppliers share… pic.twitter.com/25ctuoH1Q1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2026
१. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ (सी.एस्.आय.एस्.) या अमेरिकेच्या ‘थिंक टँक’ने प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालानुसार रशियाने युक्रेनवर केलेल्या सततच्या आक्रमणांमुळे दोन्ही देशांचे मिळून सुमारे २० लाख सैनिक मृत, घायाळ किंवा बेपत्ता झाले आहेत. यामध्ये रशियाची सर्वाधिक हानी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२. ‘सी.एस्.आय.एस्.’ने २७ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या युद्धात रशियाला प्रचंड किंमत मोजावी लागली आहे. रशियाच्या ३ लाख २५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लाख ७५ सहस्र सैनिक घायाळ किंवा बेपत्ता झाले आहेत.
३. या कालावधीत युक्रेनच्या सैन्याचीही मोठी हानी झाली आहे. युक्रेनच्या १ लाख ४० सहस्र सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर ४ लाख ६० सहस्र सैनिक घायाळ किंवा बेपत्ता झाले आहेत.
४. दुसर्या महायुद्धानंतर कोणत्याही मोठ्या सत्तेला एखाद्या युद्धात इतकी मोठी जीवितहानी किंवा घायाळ होण्याचा सामना करावा लागलेला नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाया नरसंहाराला जेवढा रशिया उत्तरदायी आहे, तेवढाच युक्रेन, तसेच त्याला शस्त्रपुरवठा करणारा अमेरिका आणि युरोपीय देश असलेला ‘नाटो’सुद्धा उत्तरदायी आहे, हे विसरून चालणार नाही ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman