हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने झालेल्या आंदोलनात मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) : हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने २५ जानेवारीला येथील ‘फ्रीडम पार्क’ येथे आंदोलन करण्यात आले. चामराजपेठ येथे ४ जानेवारीला ‘ओम शक्ती’ची माळ घातलेल्या अय्यप्पा भक्तांवर मुसलमान तरुणांनी केलेल्या आक्रमणाचा या वेळी तीव्र निषेध करण्यात आला.

तसेच राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना त्वरित बाहेर काढण्याची मागणीही या आंदोलनात करण्यात आली. (हिंदूंच्या कर्नाटकात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते. हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! कर्नाटकातून काँग्रेसचा राजकीय नायनाटच हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी एक प्रभावी उपाय ठरू शकतो, हेच खरे ! – संपादक)


या आंदोलनात श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, अय्यप्पा सेवा समाजम्चे अध्यक्ष श्री. एन्. जयराम, ओम शक्ती मंडळाचे श्री. रक्षित जय गिरीश, श्री. सुनील शेट्टी, कर्नाटक उच्च न्यायालयातील अधिवक्ता अमृतेश एन्.पी., भाजपचे नेते श्री. सप्तगिरी गौडा, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा, श्रीराम सेनेचे श्री. सुंदरेश नर्गल, श्री. मंजुनाथ यांच्यासह अनेक हिंदु संघटनांचे नेते सहभागी झाले होते. बांगलादेशी घुसखोरांचे जाळे उघड करणार्या पुनीत केरेहळ्ळी आणि संतोष कर्ताळ यांना झालेली अटक, तसेच डॉ. नागेंद्रप्पा यांचा झालेला मानसिक छळ या घटनांचा आंदोलकांनी तीव्र निषेध केला.

हिंदूंवरील अत्याचार पद्धतशीरपणे दडपण्याचा प्रयत्न ! – प्रमोद मुतालिक
आंदोलकांना संबोधित करतांना श्री. मुतालिक म्हणाले की, चामराजपेठेत ओम शक्तीची माळ घातलेल्या हिंदु महिला भक्तांवर दगडफेक करण्यात आली. हे कृत्य ‘अल्पवयीन’ मुलांनी केले, असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी याच चामराजपेठेत गोमातेचे शिर कापण्याचे क्रूर कृत्य घडले होते. तेव्हाही हिंदूंनी याचा निषेध केला होता, पण त्या वेळीही ते कृत्य ‘मानसिक रुग्णा’ने केले आहे, असे सांगून प्रकरण मिटवण्यात आले.

चामराजपेठ विधानसभा मतदारसंघात हिंदूंवर सतत आक्रमणे होत आहेत, तरीही प्रशासन पूर्णपणे गप्प आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मुतालिक यांनी व्यक्त केली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी