Ujjain Violence : उज्जैनच्या तराना येथे धर्मांध मुसलमानांकडून विहिंपच्या प्रचारकांना प्राणघातक मारहाण

  • मारहाणीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक बसगाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ

  • नमाजपठणानंतर ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मुसलमानांकडून पुन्हा हिंसाचार

उज्जैन (मध्यप्रदेश) : उज्जैन जिल्ह्यातील तराना शहरात २२ जानेवारीच्या संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास धर्मांध मुसलमानांनी विश्व हिंदु परिषदेच्या प्रचाराकावर आक्रमण केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. यात ११ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. यात अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. मुसलमानांच्या हातात धारदार शस्त्रे होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, तरी येथे मोठा तणाव होता. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र यानंतरही दुसर्‍या दिवशी, म्हणजे शुक्रवार २३ जानेवारीला दुपारच्या नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत पुन्हा हिंसाचार करत दगडफेक केली. तसेच अनेक बसगाड्यांची तोडफोड करून जाळपोळही केली. या घटनेनंतर स्थानिक हिंदु महिला काठ्या घेऊन संरक्षणासाठी बाहेर आल्या. गेल्या काही महिन्यांपासून येथे वाद चालू होता. त्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

मुसलमानांनी २२ जानेवारीला विश्व हिंदु परिषदेचे प्रचारक सोहेल ठाकूर आणि त्यांचे सहकारी  रजत ठाकूर यांना मारहाण केली होती. यात दोघेही गंभीर घायाळ झाले. दोघांनाही आधी तराना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहून त्यांना उज्जैन येथील रुग्णालयात नेण्यात आले.

हिंदु संघटनांचे पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

मारहाणीची माहिती मिळताच हिंदु संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आणि परिसरात गस्त वाढवली.

६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी २२ जानेवारीला रात्री सांगितले होते की, मारहाणीच्या प्रकरणी ६ लोकांविरुद्ध प्राणघातक आक्रमणाचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या परिसरात शांतता आहे. उज्जैन, माकडौनसह इतर ठिकाणांहून तराना येथे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात गेली अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना ही स्थिती हिंदूंना अपेक्षित नाही ! काश्मीर, बंगाल, केरळ येथे जे घडते, ते मध्यप्रदेशातही घडत आहे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • या घटनेतून हिंदूंनी स्वतःचे रक्षण स्वतःच करणे किती आवश्यक झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘पोलीस, सरकार आपल्याला वाचवेल’ या भ्रमात आता हिंदूंनी राहू नये !